काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन - latur saptrang

Breaking

Monday, February 7, 2022

काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन






 काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्यावर सुश्रुत हॉस्पिटल येथे उपचार सुरू असतांना कालच त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली होती. आज मात्र त्यांच्या निधनाची दुर्दैवी बातमी समजली. अतिशय दुःख झाले. सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात काम करतांना त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले.कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेच्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करण्यास त्यांनी अथक प्रयत्न केले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामामुळे अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव देखील करण्यात आलेला होता. त्यांच्या निधनाने नाशिकच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने वाघ कुटुंबियांवर तसेच के.के.वाघ शिक्षण संस्थेच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय त्यांच्या कुटूंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.


*भावपूर्ण श्रद्धांजली!*


*छगन भुजबळ*

*मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा.*

No comments:

Post a Comment