रेणापूर/प्रतिनिधी: शिवसेनेच्या वतीने विविध क्षेत्रातील असंघटित कामगारांसाठी ए श्रम पेन्शन योजना राबविण्यात येते. रेणापूर तालुक्यातील मोटेगाव येथून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. असंघटित कामगार व शेतमजूरांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी कामगारांची मोफत नोंदणी करून कार्ड वाटप करण्यात आले.
शासनाच्या योजनेचा लाभ शेवटच्या आणि गरजू घटकापर्यंत पोचवण्यासाठी हे अभियान चालू करण्यात आले आहे.
एकूण ४ टप्प्यामध्ये संपूर्ण रेणापूर तालुक्यात हे अभियान राबवण्यात येणार आहे.या अभियानाच्या पहिल्या टप्प्यास मोटेगाव येथून शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाचे उदघाटन शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी हनुमंतदादा पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून हणमंत आबा सोमवंशी उपस्थित होते.
या कार्यक्रमास गोपालकाका पवार, मल्लिकार्जुनअप्पा हलकांचे, माऊली पवार,प्रदीप हलकांचे,फोलाने,गणेश कसबे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मोटेगाव शिवसेना शाखाप्रमुख विकास पवार,भगवान शिंदे, सातपुते ,बाळु राऊत यांनी परिश्रम घेतले.
मोटेगाव नंतर चाडगाव, भोकरंबा,वांगदरी,मोरवड येथे कामगारांची नोंदणी केली जाणार आहे.दुसऱ्या टप्प्यात दवणगाव,पळशी,समसापूर ,तिसरा टप्पा डिघोळ, पोहरेगाव,दर्जी बोरगाव तर चौथ्या टप्प्यात कामखेडा,
पानगाव येथे नोंदणी व कार्डवाटप केले जाणार आहे.
No comments:
Post a Comment