नवी दिल्ली: रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याचा आज (२७ फेब्रुवारी) चौथा दिवस आहे. युद्धाच्या चौथ्या दिवशी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना मोठा धक्का बसलाय. आंतरराष्ट्रीय जुडो फेडरेशनने पुतिन यांना अध्यक्षपदावरून काढून टाकले आहे. युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यामुळे त्यांना या पदावरून काढल्याचे फेडरेशनने म्हटले आहे.
फक्त रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांना झटका बसला नाही तर रशियाच्या फुटबॉल संघाला देखील याचा फटका बसलाय. पोलंड आणि स्वीडन या दोन संघांनी आगामी फुटबॉल वर्ल्डकप २०२२ मध्ये पात्रता फेरीत खेळण्यास नकार दिलाय. पोलंडच्या फुटबॉल असोसिएशनचे प्रमुख सेजरी कुलेस्जा यांनी म्हटले की, युक्रेनविरुद्ध रशियाची आक्रमकता वाढली आहे. त्यामुळे राष्ट्रीय संघ रशियाविरुद्ध प्ले ऑफचे सामने खेळणार नाही. याबाबत आम्ही स्वीडन आणि चेक प्रजासत्ताक सोबत चर्चा करत आहोत.पोलंड संघाचा कर्णधार रॉबर्ट लेवांडोव्स्कीने या निर्णयाचे समर्थन केले आहे. कुलेस्जा यांची पोस्ट रिट्विट करताना लेवांडोव्स्की म्हणतो, हा योग्य निर्णय आहे. अशा परिस्थितीत रशियाच्या संघासोबत मी सामना खेळण्याचा विचार देखील करू शकत नाही. जोपर्यंत युक्रेनवर हल्ला सुरू आहे. तोपर्यंत आम्ही खेळणार नाही. रशियाचे फुटबॉलपटू आणि चाहते याला जबाबदारी नाहीत. पण आम्ही दिखावा करू शतक नाही की काहीच होत नाहीय.
मॅनचेस्टर युनायडेटने दिला दणका
मॅनचेस्टर युनायडेटने युक्रेवर झालेल्या हल्ल्यानंतर रशियाची राष्ट्रीय हवाई कंपनी एअरोफ्लोतची स्पॉन्सरशिप सोडली आहे. क्लबच्या अधिकाऱ्याने सांगितले की, युक्रेनवरील हल्ल्यानंतर एअरोफ्लोतची स्पॉन्सरशीप काढून घेतली आहे. आम्ही जगभरातील चाहत्यांची काळजी समजू शकतो. याचा फटका ज्यांना बसला आहे त्याच्या बद्दल सहानुभूती व्यक्त करतो.
जर्मन संघाने देखील हटवला लोगो
जर्मनीमधील फुटबॉल क्लब शाल्के ०४ ने देखील रशियाचा लोगो संघाच्या टी-शर्टवरून हटवला आहे. एफसी शाल्के ०४ ने क्लबच्या टीशर्टवर असलेला मुख्य प्रायोजक GAZPROMचा लोगो हटवण्याचा निर्णय घेतलाय. GAZPROM ऐवजी आता टी
No comments:
Post a Comment