युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण - latur saptrang

Breaking

Sunday, February 27, 2022

युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण



 रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलं आहे. युक्रेनमधून पोलंडमध्ये स्थलांतर करत असताना भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण झाली आहे. याबाबत पीडित विद्यार्थ्यांना आलेल्या ह्रदयद्रावक अनुभव माध्यमांना सांगितले आहेत. युक्रेन-पोलंड सीमेवर युक्रेनच्या सुरक्षा रक्षकांनी केवळ युक्रेनच्या नागरिकांना प्रवेश दिला आणि भारतीयांना बाजूला काढून मुलं आणि मुली न पाहता लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकारही समोर आलाय.

साक्षी इजनकर या विद्यार्थीनीने झी २४ तासला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं, “आम्ही जेव्हा युक्रेन-पोलंड सीमेवर आलो तेव्हा आम्हाला सुरक्षा रक्षकांनी घेरलं होतं. आम्हाला प्रवेशद्वारावर प्रवेश देण्यात आला नाही. तेथून केवळ युक्रेनच्या नागरिकांना पोलंडमध्ये प्रवेश दिला जात होता. खूप विनवण्या केल्यानंतर केवळ भारतीय मुलींना प्रवेश देण्यात आला. त्यानंतर पोलीस आले आणि त्यांनी भारतीय मुलांना बेदम मारहाण केली.”


No comments:

Post a Comment