*पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मुख्यमंत्री रोजगार योजनेतील वाहनांचे वितरण*
*लाभार्थ्यांनी स्वयंम रोजगरातून साधावी प्रगती - मंत्री छगन भुजबळ*
*नाशिक,दि.२७ फेब्रुवारी :-* महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्री रोजगार योजने अंतर्गत बेरोजगाराना स्वयंम रोजगार मिळवून देण्यासाठी आर्थिक साहाय्यातून वाहने वितरित करण्यात येत आहे. लाभार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या संधीच सोन करून स्वयंम रोजगरातून साधावी प्रगती साधावी असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
नाशिक येथील कार्यालयात मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या अंतर्गत वाहनांचे वितरण पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार जयवंतराव जाधव, जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, नानासाहेब महाले, बाळासाहेब कर्डक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, नगरसेवक जगदीश पवार, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, पंचवटी विभागीय अध्यक्ष शंकर मोकळ, दत्ता पाटील, चिन्मय गाढे आदींसह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, महाविकास आघाडीचा वतीने राबविण्यात आलेला हा उपक्रम राज्यभरातील बेरोजगारांसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना साडे तीन लाखांपर्यंत सबसिडी देण्यात येत असून महाराष्ट्र बँकेच्या माध्यमातून अल्पदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
ते म्हणाले की, गेले दोन वर्षे कोरोनाच्या काळात गेले असून अनेकांनी रोजगार देखील गमावला. त्यांना स्वयंम रोजगरातून उभी राहण्यासाठी ही महत्त्वाची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. लाभार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटी बाळगून व्यवसायात सातत्य ठेऊन प्रगती करावी असे आवाहन करत लाभार्थ्यांना त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सदर योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक प्रकाश घुगे, खादी ग्रामोद्योगचे व्यवस्थापक श्रीमती भामरे, बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक गणेश झा, समन्वयक सचिन पवार यांचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment