दापोली तालुक्यातील पालगड ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांचा भुमिपुजन समारंभ सोहळा @ युसूफ पठाण - latur saptrang

Breaking

Monday, February 28, 2022

दापोली तालुक्यातील पालगड ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांचा भुमिपुजन समारंभ सोहळा @ युसूफ पठाण


 युसूफ पठाण  :- 

दापोली तालुक्यातील पालगड ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांचा भुमिपुजन समारंभ सोहळा दापोली विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय मा.आमदार श्री.संजयराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न....                    


दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी दापोली तालुक्यातील पालगड ग्रामपंचायत हद्दीतील सौ.नेहा युवराज जाधव जिल्हा परिषद सदस्या व जिल्हा नियोजन सदस्या यांच्या जिल्हा नियोजन फंडातुन मंजूर झालेल्या विविध विकास विकास कामांचा भुमिपुजन समारंभ दापोली विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय मा.आमदार श्री.संजयराव कदम, जिल्हा परिषद सदस्या व जिल्हा नियोजन  समिती सदस्य सौ.नेहा युवराज जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.


१) पालगड फणसवाडी येथे श्री.अशोक बामणे यांचे घर ते साई मंदिर रस्ता डांबरीकरण करणे. रक्कम रू.२.०० लाख.


२) पालगड शिगवण वाडी ते ब्राह्मण वाडी रस्ता डांबरीकरण करणे. रक्कम रु.७.०० लाख.


३) ग्रामपंचायत पालगड अंतर्गत सोंडेघर पिकअप शेड  ते पठाण घर रस्ता डांबरीकरण करणे.रक्कम रु.४.०० लाख


४) हातीप शेडगे रस्ता (ग्रा.मा.क्र.२२६) डांबरीकरण करणे. रक्कम रू.६.०० लाख.


या कार्यक्रमा प्रसंगी दापोली विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष श्री.मुजीब रूमाणे,दापोली पंचायत समिती सभापती सौ‌.योगिता बांद्रे,युवक प्रदेश सरचिटणीस व मा.जिल्हा परीषद विरोधी पक्ष नेते श्री.अजय शेठ बिरवटकर,जिल्हा परिषद सदस्या व जिल्हा नियोजन समिती सदस्य सौ.नेहा जाधव,पालगड ग्रामपंचायत उप सरपंच श्री.गजानन दळवी,पालगड ग्रामपंचायत सदस्य श्री.कासाम मालदार, युवक जिल्हा उपाध्यक्ष श्री.नागेश शेडगे,पालगड ग्रामपंचायत सदस्या सौ.प्रतिक्षा पवार,असुद ग्रामपंचायत उप सरपंच श्री.राकेश उर्फ पिंट्या माने,श्री.विलास जाधव,श्री.प्रमोद चव्हाण,श्री.प्रशांत पवार,श्री.अक्षय बेलोसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खेड शहर प्रसिद्धी माध्यम प्रमुख श्री.किशोर साळवी तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment