ओवैसींवर हल्ला करणाऱ्या आरोपीचे CM योगींसह भाजप नेत्यांबरोबर फोटो - latur saptrang

Breaking

Friday, February 4, 2022

ओवैसींवर हल्ला करणाऱ्या आरोपीचे CM योगींसह भाजप नेत्यांबरोबर फोटो

 






ओवैसींवर हल्ला करणाऱ्या आरोपीचे CM योगींसह भाजप नेत्यांबरोबर फोटो

एआयएमआयएमचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर (Attack on Asaduddin Owaisi) आता काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. ओवैसींवर झालेल्या हल्ल्यातील आरोपी सचिन पंडित आणि शुभम या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, दोन्ही आरोपींची चौकशी सुरू आहे. त्यातील सचिन हा कायद्याचा विद्यार्थी असून, तो भाजप पक्षाचा सदस्य असल्याचं समजतंय. तसंच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath), उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा, खासदार महेश शर्मा यांच्यासह अनेक भाजप नेत्यांसोबत सचिनचे फोटो आहेत. सोशल मीडियावरून हे फोटो आता समोर येत आहेत.

Asaduddin Owaisi Attack Case accused is Member of BJP

Asaduddin Owaisi Attack Case accused is Member of BJP

प्राथमिक माहितीनुसार, हल्ल्यातील आरोपी सचिन पंडित हा ग्रेटर नोएडातील बदलपूर भागातील रहिवासी आहे. दुराई गावात राहणारे सचिनचे वडील विनोद पंडित हे खासगी कंपनीत कंत्राटदार आहेत. तर दुसरा आरोपी शुभम हा सहारनपूरचा रहिवासी आहे. शुभम हा दहावी पास असून तो शेती करत असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांच्या तपासात शुभमची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं समोर आलं आहे. चौकशीदरम्यान शुभम आणि सचिन यांनी सांगितले की, ते दोघंही असदुद्दीन ओवैसी आणि त्यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवैसी यांच्या वक्तव्यांमुळे संतापले होते. ते फेसबुक, ट्विटर, सोशल मीडियावर ओवैसी बंधूंची भाषणं ऐकायचे आणि त्यांचा प्रचंड तिरस्कार करायचे.

दरम्यान, दोन्ही आरोपींकडून देशी बनावटीची मुंगेर प्रकारचं पिस्तूल जप्त करण्यात आलं आहे. हे त्यांनी कोणाकडून खरेदी केलं होतं याची स्पष्ट माहिती मिळू शकली नसली तरी, काही लोकांची नावं समोर आली असून, त्यांनाही अटक करण्यात येणार आहे.



No comments:

Post a Comment