Covid deaths : मृत्यूंच्या यादीत जगात तिसऱ्या स्थानी
देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. गेल्या २४ तासांत १ लाख ४९ हजार ३९४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १,०७२ जणांचा मृत्यू (Covid deaths) झाला आहे. याआधीच्या दिवशीच्या तुलनेत ही रुग्णसंख्या १३ टक्क्यांनी कमी आहे. दिवसभरात २ लाख ४६ हजार ६७४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात १४ लाख ३५ हजार ५६९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दैंनदिन पॉझिटिव्हिटी रेट ९.२७ टक्के आहे.
दरम्यान, देशातील कोरोना मृतांचा आकडा ५ लाखांवर गेला आहे. यामुळे कोरोना मृत्यूंच्या यादीत जगात भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. अमेरिकेत ९.१ लाख, ब्राझीलमध्ये ६.३ लाख रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर कोरोना मृत्यूंच्या यादीत भारतानंतर रशियाचा क्रमांक लागतो. रशियात ३.३ लाख लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
१ जुलै २०२० रोजी भारतातील मृतांचा (Covid deaths) आकडा ४ लाखांच्या पुढे गेला होता. त्यानंतर २१७ दिवसांनी मृतांचा आकडा ५ लाखांच्या पुढे गेला आहे. दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. त्यानंतर देशात लसीकरणाचा वेग वाढल्याने मृत्यूंचे प्रमाण कमी झाले.
याआधी देशात बुधवारी दिवसभरात १ लाख ७२ हजार ४३३ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, १ हजार ८ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान २ लाख ५९ हजार १०७ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. गुरूवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९५.१४ टक्क्यांवर होता. तर, आठवड्याचा कोरोना संसर्गदर १२.९८ टक्के आणि दैनंदिन कोरोना संसर्गदर १०.९९ टक्के नोंदवण्यात आला होता.
कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता खबरदारी म्हणून आतापर्यंत १.३४ कोटी बूस्टर डोस देण्यात आले आहेत.
दिल्लीतील सक्रिय कोरोना रुग्णसंख्येत ६० टक्क्यांनी घट
देशाची राजधानी दिल्लीतील कोरोनाचे संकट बर्यापैकी कमी झाले असून आठवडाभरात सक्रिय रुग्णांची संख्या ६० टक्क्यांनी कमी झाली आहे. संकट कमी झाल्यामुळे निर्बंधही शिथिल केले जाण्याची शक्यता आहे. दिल्ली आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या शुक्रवारी होणार्या बैठकीत याबाबतचा निर्णय होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.
तिसर्या लाटेचा धोका कमी झाला…
२६ जानेवारी रोजी दिल्लीत कोरोना रुग्ण संख्येत ७ हजार ४९८ ने वाढ झाली होती. त्यादिवशी २९ लोकांचा मृत्यू झाला होता तर संक्रमण दर १०.५९ टक्के इतका होता. या दिवशी सक्रिय रुग्णांची संख्या २५ हजार ७१० इतकी होती. याच्या एक आठवड्यानंतर म्हणजे २ फेब्रुवारीला दैनिक रुग्ण संख्यावाढ ३ हजार २८ इतकी नोंदवली गेली. संक्रमण दर ४.७३ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे तर सक्रिय रुग्णांची संख्या १४ हजार ८७० पर्यंत कमी झाली आहे. मागील दोन वर्षांत कोरोनाने २५ हजार ०१९ लोकांचा बळी घेतलेला आहे. तिसर्या लाटेचे संकट कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील शाळा उघडण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
देशातील बूस्टर डोसची स्थिती
श्रेणी………बूस्टर डोस
आरोग्य कर्मचारी…. ३५,०९,९७३
फ्रंटलाईन वर्कर्स…. ४२,८४,४६८
६० वर्षांहून अधिक… ५६,८०,६७६
No comments:
Post a Comment