यूसुफ पठान पत्रकार मालेगाव
पोलीस ठाणे चिकलठाणा येथे दि.२६.२.२०२२ रोजी गुन्हा क्रं.६४/२२ क.४२०,४०६ भादवी प्रमाणे गन्हा दाखल होता.नमुद गुन्हयात फिर्यादी ज्ञानेश्वर सोने रा बजाज नगर औरंगाबाद यांचे तक्रार प्रमाणे अनोळखी आरोपीताने फिर्यादी ज्ञानेश्वर सोने यांचा विश्वास संपादन करुन एशीयन पेंट चा १२,६१,१९५ रु किंमतीचा माल भरलेली गाडी निपाणी येथील गोडाऊन येथुन औरंगाबाद येथील बाबा ट्रेडर्स येथे पोच करतो म्हणुन घेऊन गेला परंतु गाडी माल घेवुन पोचली नसल्याने फिर्यादी यांना लक्षात आले की नमुद अनोळखी इसामाने त्यांचे गाडीतील पेंट चा माल घेवुन फरार झालेला आहे.
_ चिकलठाणा येथे नमुद तक्रार प्राप्त होताच मा पोनि गात सो यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयाचा तपास सपोनि शरदचंद्र रोडगे यांना देण्यात आला होता. सपोनि रोडगे यांनी तात्काळ गोपणीय बातमीदार यांचेडुन माहीती काढली असता नमुद माल आरोपीताने मध्यप्रदेश येथे घेऊन गेल्याची खात्रीशीर माहीती मिळाल्याने मा पोलीस अधिक्षक सो औरंगाबाद ग्रामीण यांचे परवानगीने सपोनि शरदचंद्र रोडगे,बीट जमादार थोटे,पोना दिपक सुरोशे यांना राज्य मध्यप्रदेश येथे जाण्याची परवानगी देऊन रवाना करण्यात आले.नमुद पथक यांनी ४८ तासाचे आत मध्यप्रदेश येथे जाऊन आरोपी नामे लोकेश केदारमल कुम्भज वय ४५ रा वैभव नगर इंदोर मध्यप्रदेश यास ताब्यात घेऊन विचारपुस करता नमुद माल आरोपीतास किशोर नामक व्यक्तीने दिल्याचे तपासात निष्पण्ण झाले आहे. आरोपी नामे लोकेश केदारमल कुम्भज वय ४५ रा वैभव नगर इंदोर मध्यप्रदेश यास विश्वासात घेऊन विचारपुस करता नमुद माल त्याने मौजे बगवण्य ता धामनोड जि धार मध्यप्रदेश येथील गोडाऊन मध्ये ठेवल्याचे माहीती दिल्याने नमुद ठिकाणी जाऊन पोलीस पथकाने पोस्टे धामनोड जि.धार मध्यप्रदेश पोलीस यांचे मदतीने गुन्हयातील गेला माल पंचासमक्ष १७२४ डबे एशीयन पेंट चे १२,६१,१९५ रु असा जप्त केला आहे.तसेच नमुद गुन्हयातील आरोपी नामे लोकेश केदारमल कुम्भज वय ४५ रा वैभव नगर इंदोर मध्यप्रदेश यास दि ७.३.२२ रोजी अटक केली असुन गुन्हयातील इतर आरोपीतांचा शोध घेणे चालु आहे.
नमद कामगीरी ही मा निमीत गोयल पोलीस अधिक्षक सो औरंगाबाद ग्रा,मा पवनकुमार बनसोड अपर पोलीस अधिक्षक सो औरंगाबाद ग्रा,मा जयदत्त भवर सो उपविभागीय पोलीस अधिकारी औरंगाबाद ग्रामीण, पोनि देविदास गात पोस्टे चिकलठाणा यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे चिकलठाण्याचे सपोनि शरदचंद्र रोडगे,पोहेका/थोटे,पोना/सूरोसे यांनी कामगीरी पार पाडली आहे. ४८ तासाचे आत नमुद पथकाने मध्यप्रदेश येथे जाऊन अविरत १३०० किमी चा प्रवास करुन गुन्हयातील गेलेला संपुर्ण १०० टक्के माल १७२४ डबे एकुण किंमत १२,६१,१९५ रु असा जप्त केला आहे. नमुद पथकाने फसवणुक करणारी आंतरराज्यीय टोळी उघडकिस आणल्याने वरिष्ठ अधिकारी यांचेकडुन कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment