जिल्हा परिषद व पंचायत समिती असो महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट अध्यक्ष म्हणून राहुल केंद्रे यांना पुरस्कार
केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते पुणे येथे झाला सन्मान
पुणे ---
पुणे येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्रातील कर्तव्यदक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती व जिल्हा परिषद सदस्य यांच्या सत्कार सोहळ्यात एकूण 36 जिल्हा परिषद अध्यक्षनमधून लातूर चे जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केलेली कामगिरी पाहून, यांनी राबवलेले नावीन्यपूर्ण उपक्रम व त्याची केलेली प्रभावी अंमलबजावणी, या सर्व गोष्टी पाहून एक कर्तृत्ववान जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून असोसिएशन तर्फे
जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांचा केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते पुणे येथे कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यावेळी वर्धा व भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतात जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी असोसिएशन चे अध्यक्ष कैलास गोरे पाटील, सर्व पदाधिकारी व महाराष्ट्रातील विविध जिल्हा परिषदचे अध्यक्ष, पंचायत समिती सभापती व मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते.
No comments:
Post a Comment