प्रगत राष्ट्रांपेक्षा भारतामध्ये महिलांचा अधिक सन्मान-आ.जयकुमार रावल...
दोंडाईचा भाजपा महिला आघाडीतर्फे विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करत- महिला मेळावा संपन्न....
जनमत-
दोंडाईचा- देशातील इतर प्रगत राष्टापेक्षा भारतामध्ये महीलांचा अधिक सन्मान होतो आणि हेच आपल्या देशाच्या प्रगतीचे खरे कारण असल्याचे मत आमदार जयकुमार रावल यांनी दोंडाईचा भाजपा महिला आघाडीतर्फ आयोजीत महिला मेळावा व सन्मान प्रसंगी व्यक्त केले.
दिनांक ६ मार्च रविवार रोजी संध्याकाळी ३.०० वाजता सुवर्ण मंगल कार्यालय येथे दोंडाईचा शहर भाजपा महिला आघाडीतर्फे महिला दिनानिमित्त दोन दिवस अगोदर महिला मेळावा घेण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार जयकुमार रावल, प्रमुख पाहुणेपदी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कुसुम निकम, महिला व बालकल्याण सभापती धरती देवरे, भाजपाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सविता पगारे, बचत गटाच्या समन्वयक पुजा खडसे, वैद्यकीय अधिकारी डॉ युतिका भामरे, भाजपा दोंडाईचा शहराध्यक्ष प्रविण महाजन, माजी उपनगराध्यक्ष रविंद्र उपाध्ये, माजी पाणीपुरवठा सभापती वैशाली महाजन, माजी आरोग्य सभापती मनिषा जितेंद्र गिरासे, माजी शिक्षण सभापती सुफीयान तडवी, शहराध्यक्ष महिला आघाडी दोंडाईचा प्रा.ईशरतबानु शेख, आत्मनिर्भर भारताच्या जिल्हाध्यक्ष राखी उपाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आ.जयकुमार रावल यांनी बोलतांना सांगितले की, अमेरीकेत लोकशीहीची स्थापना होऊन ३०० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. तरी देखील महिलांना आपल्या हक्कासाठी लढावे लागले. त्यांनी मतदानासाठी, सार्वजनिक वाहतूकमध्ये आसनासांठी मोठे आंदोलन उभारल्याची इतिहासात नोंद आहे. त्याउलट भारतात लोकशाही स्थापन होऊन ७५ वर्षांपेक्षा कमी काळ झाला आहे. तरी देखील भारताच्या महिला सर्व क्षेत्रात प्रगती करीत आहेत आज भारतीय महिला देशाच्या सुरक्षा सिमेवर देखील गस्त घालण्यास सज्ज झाल्या आहेत. म्हणुन इतर राष्टाच्या तुलनेत भारतामध्ये महिलांना अधिक सन्मान मिळत असुन भारताच्या प्रगतीचे हेच खरे कारण असल्याचे मतही शेवटी त्यांनी नोंदवले.
तसेच याठिकाणी सविता पगारे यांनी महिलांसाठी केंद्र शासनाच्या योजनांची माहिती दिली. धरती देवरे यांनी महिलांना प्रगतीची समान संधी असुन शिक्षणामुळे महिलांना सन्मान प्राप्त होत असल्याचे सांगितले. पुजा खडसे यांनी महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्माण केल्याचे सांगितले.
यावेळी कार्यक्रमात महिलांसाठी विविध स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. त्यात माझी मुलगी माझा अभिमान, ३० सेकंदात विविध महिलांसोबत जास्तीत जास्त सेल्फी, कोरोना काळात उत्कृष्ट काम केलेल्या डॉ अर्चना पाटील, पोलीस काँन्स्टेबल पुजा पाडवी व नेटसेट मध्ये यश मिळवलेल्या दिपश्री प्रकाश अहिरराव व वृषाली चेतन निकम यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुवर्णा कुचेरीया, ज्योत्स्ना पवार, प्रिती पाठक यांनी तर आभार प्रदर्शन रोहिणी पाटील यांनी केले. कार्यक्रमात विविध स्पर्धांचे परिक्षण कुमुद अग्रवाल, टिना उपाध्ये, वैशाली महाजन, मनिषा गिरासे, इंदीरा रावल, जयश्री अहिरराव व मनिषा गुजराथी आदी मान्यवर महीलांनी केले आहे.
No comments:
Post a Comment