गो स्लिम एरोबीक्स उदगीर तर्फे
जागतिक महिला दिन निमित्य
" स्त्री-आरोग्य जागरूकतेचा अनोखा उपक्रम "
गो स्लिम एरोबीक्स फिटनेस सेंटर उदगीर तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीचा गौरव म्हणून गो स्लिम मेंबर्स आयोजित उदगीर महा प्रदक्षिणा सायकल रॅली घेऊन उदगीर शहरातील सर्व महिला नागरिकांना व्यायामाबद्दल जागृतीचा संदेश देण्यात आला.
सहभागी महिलांनी अगदी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन स्वास्थ व आरोग्याच्या दिशेने आपली इच्छाशक्ती दाखवत इतरांना प्रोत्साहित केले. त्याबद्दल सर्व गो स्लिंम फॅमिली उदगीर यांचे मनःपूर्वक आभार.
रॅलीचे उत्कृष्ट आयोजन गो स्लिम उदगीर चे संस्थापक तथा प्रशिक्षक सौ. अनिता युवराज कवठाळे यांनी केले तर सहभागी सदस्य सौम्या कवठाळे, सौ. स्नेहा उपपरबावडे, सौ. ज्योती कांबळे, सौ. रेशमा सदानंदे, सौ.पूजा वाघमारे, सौ. वर्षा लखने, प्रियंका पाटील, प्रतिक्षा बोयने, रागिनी पांचाळ,यांनी आपले मोलाचे सहभाग नोंदवून आरोग्य जागरूकतेचा महिला दिनानिमित्त संदेश दिला त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.
No comments:
Post a Comment