शीख गुरूंनी बलिदानासोबत उत्तम संतसाहित्य निर्माण केले – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी - latur saptrang

Breaking

Wednesday, March 23, 2022

शीख गुरूंनी बलिदानासोबत उत्तम संतसाहित्य निर्माण केले – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

 मुंबई, दि. 23 :- शीख धर्माच्या महान गुरूंनी धर्म रक्षणार्थ एकीकडे स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिलेतर दुसरीकडे मनुष्याच्या आत्मोद्धारासाठी उत्तम संतसाहित्य निर्माण केले. या संत साहित्यातून आत्म्याला शांती मिळते तसेच मनुष्याला सजग राहण्याचा संदेश मिळतोअसे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.  

शिखांचे नववे गुरु तेगबहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वानिमित्त (जन्मजयंती) मंगळवारी (दि. २२) राजभवन येथे किर्तन दरबाराचे आयोजन करण्यात आलेत्यावेळी राज्यपाल कोश्यारी बोलत होते.  किर्तन दरबार सोहळ्याला अनेक प्रतिष्ठित शीख बांधव उपस्थित होते.

गुरु तेगबहादूर यांनी धर्मासाठी व राष्ट्रासाठी जसे प्राणांचे बलिदान दिलेतसेच बलिदान त्यांच्या पूर्वजांनी व त्यांच्या मुलांनी देखील दिले होते. गुरु तेगबहादूर यांच्या प्रेरणादायी जीवनातून आपण काही शिकलो नाही तर पुनश्च आपल्याला धार्मिक आक्रमणाचा सामना करावा लागेलअसे राज्यपालांनी सांगितले.  राजभवनाच्या नवीन दरबार हॉल मध्ये प्रथमच शब्द किर्तन होत असल्यामुळे राजभवन धन्य झाले आहे, असे उद्‌गार राज्यपालांनी यावेळी काढले.

यावेळी दमदमी तकसाळचे अध्यक्ष बाबा हरनाम सिंहअल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरापार्श्वगायिका अनुराधा पौडवालनिर्मल संत डॉ रामेश्वरानंदभारत सरकारच्या प्रकाश पर्व समितीचे सदस्य जी. एस गिलशीख संगतचे राष्ट्रीय सचिव राजन खन्नामहाराष्ट्र शीख असोसिएशनचे निमंत्रक मलकित सिंह बल आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

0000

Maharashtra Governor attends 400th Prakash Purab of

Guru TeghBahadur at Raj Bhavan

 

     Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari attended a Kirtan Darbar on the occasion of the 400th Prakash Purab of Guru TeghBahadur at Raj Bhavan Mumbai on Tuesday (22 Mar)

      Speaking on the occasion, Governor Koshyari paid rich tributes to Guru Tegh Bahadur. He said Sikh Gurus not just sacrificed their lives to save the Dharma, but they also created beautiful literature for the emancipation of mankind.

       Khalsa Pramukh of Damdami Taksal Baba Harnam Singh, Nirmal Sant Dr Rameshwarnand, former Chairman of Minority Commission Iqbal Singh Lalpura, Member of the High Power Committee for the celebration of the 400th Prakash Purab Sardar G S Gill, National Secretary of Sikh Sangat Rajan Khanna, Convenor Malkit Singh Bal and members of the Sikh community were present. Playback singer Anuradha Paudwal performed the Shabad Seva on the occasion.

000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/a5Cxem1
https://ift.tt/J1h39oq

No comments:

Post a Comment