मुंबई, दि. 23 : भारताचे स्वातंत्र सेनानी शहीद क्रांतीकारी भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या स्मृतीदिनानिमित्त मंत्रालयात ‘शहीद दिनी’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांना 23 मार्च रोजी फाशी झाली होती. त्यांनी देशासाठी दिलेल्या बलीदानाचे स्मरण करण्याकरिता आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय चहांदे यांच्यासह उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांनी शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या प्रतिमेश पुष्प अर्पण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/tfq7cSA
https://ift.tt/GKey6N1
No comments:
Post a Comment