मुंबई, दि. १२ :- आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले.
वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्वर्गीय चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख ‘कर्तृत्वाचा सह्याद्री’ असा केला जातो. इतके महत्त्वपूर्ण योगदान त्यांनी देश व राज्याच्या उभारणीत दिले आहे, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी अभिवादन संदेशात म्हटले आहे.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/ykBLNW6
https://ift.tt/tqbuJ6R
No comments:
Post a Comment