स्व.मिनाताई ठाकरे, स्मृति दिन जागतिक महिला दिन कर्तुत्वान नारी गौरव सोहऴा साजरा - latur saptrang

Breaking

Saturday, March 12, 2022

स्व.मिनाताई ठाकरे, स्मृति दिन जागतिक महिला दिन कर्तुत्वान नारी गौरव सोहऴा साजरा



शिवसेना महिला आघाड़ी नांदगांव विधानसभा मतदार संघ व स्व.सरस्वती इच्छाराम धामणे महिला बहुदेशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमांने नांदगांव जैन धर्म शाऴा येथे स्व.मिनाताई ठाकरे, स्मृति दिन जागतिक महिला दिन कर्तुत्वान नारी गौरव सोहऴा साजरा करण्यात आला. 

कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व राष्ट्रीय महिला राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले,तारा राणी, अहिल्याबाई होळकर,झाशीची राणी,रमाई, स्व,मिनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन,नाम स्मरण करुन सुरुवात करण्यात आली  या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शिवसेना आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या धर्मपत्नी सामाजिक कार्यकर्त्या अंजुम ताई कांदे या उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. नगर अध्यक्षा श्रीमती शोभाताई विजय कासलीवाल,मा. नगर अध्यक्षा सौ.शबाना एकबाल शेख़, उद्योगपती सौ. अलकाताई संजीव धामणे,सौ.मयुरी कुणाल खरोटे, सरपंच सौ. मंगलाताई प्रकाश नावंदर, सामाजिक कार्यकर्त्या सौ. ज्योत्स्ना संजीव निकम, नगरसेविका सौ. योगिनीताई संतोष गुप्ता, शिवसेना महिला आघाड़ी जिल्हा उपअध्यक्षा संगिताताई बागुल, तालुका अध्यक्षा विद्याताई जगताप, शहर अध्यक्षा रोहणीताई मोरे, स्व. सरस्वती इच्छाराम धामणे महिला बहुदेशीय संसथेच्या अध्यक्षा सौ. सपना अनिल धामणे, उपाध्यक्षा सौ.सुशिला पारख , कार्यअध्यक्षा सौ. आशा महावीर सुराणा.  कार्यक्रमात विविध प्रकारचे सांस्कृतिक खेऴांचे आयोजन करण्यात आले सहभागी विजेत्यांना अध्यक्षा अंजुमताई कांदे व प्रमुख पाहुणे शोभाताई कासलीवाल, शबानाताई शेख,मंगला नावंदर,अलकाताई धामणे, योगिनीताई गुप्ता, मयुरीताई खरोटे,सुनिताताई बागुल,विद्याताई जगताप आदि मान्यवरांच्या हस्ते पैठणीचे बक्षिसे देण्यात आले, पैठणीचे मानकरी पुढिल प्रमाणे पहिले बक्षिस-डाॅ.सौ तृप्ती श्रीकांत देवरे,सौ सारीका निलेश पाटणी *साथ समुद्र पार *सौ रंजनी संजय भोकरे,सौ गिता रत्नपारखी, सौ योगिता रत्नपारखी,सौ प्रियंका संतोष खेरणार *काॅस बाॅल खेऴ * सौ ममता शरद लोहाडे सौ अनिता लोहाडे सौ कविता अनिल आहेर सौ कविता महावीर पांडे सौ गिता अग्रवाल,तसेच पोलिस कर्मचारि मोनालि ठाकरे,संध्याराणी कोकाटे,रंजना शिंदे यांना पैठणी देण्यात आल्या, महिला दिन दिवशी जन्मदिन असलेल्या महिलांना पैठणी देण्यात आल्या

शहरातील महिला डॉक्टर,शिक्षीका, अभियंता,ब्युटिशीयन, व्यवसाईक, बैंक कर्मचारि शिवन क्लासेस यांचा शाल व गुलाब पुष्प देवून नारी गौरव करण्यात आला विशेष सहकार्य आसॅम ग्रुपचे लाभले सौ प्रिती निलेश सुराणा,सौ श्वेता आनंद चौपडा,सौ पुनम विकी चौपडा, सौ निकिता निरज सुराणा

 कार्यक्रमाचे सुत्र संचालन सौ  माधुरी अंकुश सुराणा,सौ राखी कमलेश सुराणा यांनी केले व स्व.सरस्वती इच्छाराम धामणे महिला बहुदेशीय संस्थेच्या अध्यक्षा सपना अनिल धामणे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment