लातूरच्या विकासाचा अनुशेष भरून निघणार
६८ कोटींच्या विकासकामांना शासनाची मंजुरी
महापौरांनी मानले राज्य शासन व पालकमंत्र्यांचे आभार
लातूर/प्रतिनिधी: शहरातील विविध विकासकामांसाठी लातूर शहर महानगरपालिकेने राज्य शासनाकडे पाठवलेल्या ६८ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे.या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यामुळे शहरातील विकासकामांचा अनुशेष भरून निघणार आहे.हा निधी मंजूर केल्याबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी राज्य शासनासह पालकमंत्री अमित देशमुख यांचे आभार मानले आहेत.
शहराचा सर्वंकष विकास करता यावा यासाठी महानगरपालिकेने हा प्रस्ताव तयार केला होता.विविध भागातील रस्ते,नाली तसेच मुख्य रस्त्यावरील दुभाजकांसह सर्व प्रभागात विकासकामे करण्यासाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
विकास कामांसाठी ६८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याने शहराचा विकासाचा अनुशेष दूर होणार आहे.या निधीतून शहराअंतर्गत ५७ किलोमीटर रस्ते विकसित करण्यात येणार आहेत.याशिवाय १२ किलोमीटर अंतराच्या गटारी व मुख्य रस्त्यावरील ४ किलोमीटर अंतराचे दुभाजक विकसित केले जाणार आहेत.
शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने हा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे.या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली असून लवकरच निधी उपलब्ध होणार आहे. महानगरपालिकेने पाठवलेल्या प्रस्तावास मान्यता देत विकासकामांना मंजुरी मिळवून दिल्याबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी राज्य शासनासह जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
No comments:
Post a Comment