तालुक्यातील मौजे के-हाळा शिवारातील श्री मनीष सतीशसिंग गौर यांची कंपनी भगवती ऍग्रो बायो फ्युल. शॉर्टसर्किटमुळे कंपनीतील गोडाऊनला आज मंगळवारी 3 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली . आग लागल्याचे लक्षात येताच येथील प्रत्यक्ष दर्शीनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तसेच आग विझविण्यासाठी तातडीने मदतीची मागणी केली. माहिती मिळताच राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी तातडीने सिल्लोड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला येथे पाचारण केले. सिल्लोड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी लगेचच आग आटोक्यात आणल्याने बरेचसे नुकसान टळले, शिवाय गहू, हरभरा सारखे रब्बीचे पीक परिसरातील शेतात उभे असल्याने पुढील धोका टळाला. याबाबत केऱ्हाळा येथील गावकरी व कंपनीचे सतीश गौर यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार , उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, तसेच सिल्लोड नगर परिषद प्रशासनाचे आभार मानले.
Wednesday, March 2, 2022
भगवती ऍग्रो बायो फ्युल. शॉर्टसर्किटमुळे कंपनीतील गोडाऊनला भीषण आग लागली
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment