Russia Ukraine war : युक्रेनमध्ये पंजाबमधील विद्यार्थ्याचा मृत्यू, सलग दुसर्या दिवशी भारताला मोठा धक्का
खार्किव (युक्रेन) :
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान बुधवारी भारतासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. मृत विद्यार्थी पंजाबच्या बर्नाला येथील रहिवासी असल्याचे समजते. कालच खार्किवमध्ये गोळीबारात कर्नाटकातील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा भारताला मोठा धक्का बसला आहे. रशिया-युक्रेन युद्ध आता निर्णायक वळणावर येवून ठेपले आहे. ( Russia Ukraine War Live ) युक्रेनची राजधानी कीव्हवर कब्जा मिळविण्यासाठी रशियन कमांडो पथक उतरले आहे. शहराबाहेर ६४ किलोमीटर अंतर रशियन लष्कराने कब्जा केला आहे. अशातच युक्रेनच्या दक्षिण-पूर्व भागातही रशियन सैन्याने आगेकूच सुरु असल्याचे वृत्त आहे. आज सकाळी खार्किवमध्ये रशियन सैन्याने हवाई मार्गाने घुसखोरी केली. यानंतर एका हॉस्पिटलमध्ये हल्ला केल्याचे युक्रेनच्या लष्कराने म्हटलं आहे
No comments:
Post a Comment