लातूर, लातूर येथील अण्णाभाऊ साठे विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तू नरसिंगे यंाच्या संदर्भात औरंगाबाद उच्च न्यायालयाने जैसे थे चा आदेश दिलेला असताना त्या आदेशाचा अवमान केल्या प्रकरणी लातूरच्या तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे.
लातूर येथील ग्राम परिसर शिक्षण संस्थेद्वारे अण्णाभाऊ साठे हायस्कूल ही शाळा चालवली जाते. सदरील शाळेचे मुख्याध्यापक म्हणून दत्तू नरसिंगे हे काम पाहत आहेत. संस्थेअंतर्गत दोन गटांमध्ये वाद आहे .सदरील संस्थेचे एकूण नऊ सदस्य होते. त्यापैकी पाच विश्वस्तांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे सदर संस्थेमध्ये अध्यक्ष व सचिव यांचा वेगळा गट आहे.सचिवाने दत्तू नरसिंगे यांना बेकायदेशीरपणे दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी बडतर्फ केले आहे.सदरील बडतर्फीच्या नाराजीने दत्तू नरसिंगे यांनी तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे अर्ज सादर केला. सदरील अर्जावर सुनावणी होऊन तृप्ती अंधारे यांनी दत्तू नरसिंग यांच्या विरोधात निर्णय दिला. २९ सप्टेंबर २०२१ निर्णयाच्या नाराजीने दत्तू नरसिंगे यांनी उपसंचालक शिक्षण लातूर यांच्याकडे धाव घेतली. त्यावर उपसंचालक यांनी वेळोवेळी सुनावणी घेऊन व पुराव्याची तपासणी करून तत्कालीन शिक्षणाधिकारी यांचा दिनांक २९ मार्च २०२१ चा निर्णय रद्द ठरवला. परंतु शिक्षण उपसंचालक यांनी सुमारे चोवीस तासांमध्ये स्वतःच्या निर्णयाला स्थगिती दिली.त्याच्या नाराजीने दत्तू नरसिंगे यांनी उच्च न्यायालयामध्ये ऍड.रामराव बिरादार यांच्यामार्फत याचिका क्रमांक १३१०४/२०२१ दाखल केली.
सदरील याचिकेची वेळोवेळी सुनावणी होऊन दिनांक १४ जानेवारी २०२२ रोजी शिक्षण उप संचालक यांनी त्यांचा दिनांक १० नोव्हेंबर २०२१ चा स्थगिती आदेश मागे घेऊन ९ नोव्हेंबर २०२१ आदेश कायम ठेवला. सदरील आदेशाच्या नाराजीने संस्थेचे सचिव यांनी उच्च न्यायालय मध्ये याचिका क्रमांक १३४२/ २०२२ दाखल केली.सदरील याचिकेची प्राथमिक सुनावणी प्राथमिक सुनावणी दिनांक २८ जानेवारी २०२२ ला झाली व उच्च न्यायालयाने जैसे थे ठेवण्याचा आदेश पारित केला.
परंतु तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी सदरील आदेशाचे उल्लंघन करत १६ फेब्रुवारी २०२२ ला तेलंगे यांना तात्पुरत्या स्वरूपाचा प्रभारी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार दिला. या नाराजीने मुख्याध्यापक दत्तू नरसिंगे यांनी पुन्हा उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे अवमान याचिका क्रमांक १७९/२०२२ दाखल केली.या याचिकेची दिनांक २ मार्च २०२२ ला सुनावणी झाली व उच्च न्यायालयाने तृप्ती अंधारे यांना दिनांक २८ जानेवारी २०२२ च्या आदेशाचा अवमान प्रकरणी नोटिसा बजावण्याचे आदेश पारित केला याचिकाकर्ते यांच्या मार्फत ऍड. रामराव बिरादार यांनी काम पाहिले पुढील सुनावणी आठवड्याने ठेवण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment