गरवारे मेट्रो स्थानकाजवळ गाडीतून उतरून आजूबाजूच्या सर्वांना हात दाखवत, नमस्कार करत पंतप्रधानांनी गरवारे मेट्रो स्थानकात प्रवेश केला. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी गरवारे मेट्रो स्थानक सज्ज होते. मेट्रोचे अधिकारी, महापौर व अन्य राजकीय मंडळींनी पंतप्रधानांचे यावेळी स्वागत केले. त्यानंतर गरवारे मेट्रो स्थानकाची पाहणी करत पंतप्रधानांनी गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन ते आनंद नगर मेट्रो स्टेशन दरम्यान प्रवास केला.
मेट्रो स्थानक सजले
गरवारे कॉलेज मेट्रो स्थानक पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सजवण्यात आले होते. आकर्षक झेंडूच्या फुलांच्या माळा, व्हर्टिकल गार्डन, रांगोळ्यांच्या पायघड्या, मेट्रोची माहिती देणारे फलक, मेट्रोची पर्यावरण पूरक फिडर सर्विस देण्यासाठी सज्ज असलेल्या इलेक्ट्रिक गाड्या, त्यामुळे गरवारे कॉलेज मेट्रो स्थानकाला आज वेगळेच स्वरूप आले होते.
बघ्यांची गर्दी
परिसरात मोदींना पाहण्यासाठी आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांची रस्त्यांवर काही ठिकाणी गर्दी झाल्याचे दिसते. तर काही ठिकाणी नागरिक आपल्या इमारतीच्या खिडकी मधून पाहताना दिसले.
गरवारे कॉलेज परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी गरवारे कॉलेज परिसरात पोलिसांसह विविध सुरक्षा यंत्रणांचा कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या परिसरातून कोणालाही प्रवेश करण्यास परवानगी नव्हती. येणा जाणारा प्रत्येकाला पायी चालणाऱ्याला सुद्धा या परिसरात प्रवेश बंद होता. यामुळे पुणेकर नागरिक नाराज झाले.
No comments:
Post a Comment