नामदार छगनरावजी भुजबळ साहेब
मंत्री, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
ओ.बी.सी च्या राजकीय आरक्षणासाठी ताकतीने लढा देणारे ओ.बी.सी चे राष्ट्रीय लोकनेते छगनरावजी भुजबळ साहेबांना शौर्याचे प्रतिक म्हणून चळवळीच्या कार्यकर्त्यांनी गदा भेट दिली, ही गदा ओ.बी.सी चा सातत्याने विरोध करणाऱ्या साठी कर्दनकाळ असेल!
ओ.बी.सी आरक्षण अबाधित राहण्यासाठी मिळालेल्या आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब,समीरभाऊ भुजबळ नेहमीच ओ.बी.सी बहुजन यांच्या पाठीशी खंबीर पने उभे आहेत; राज्याचे राज्यपाल यांच्या कडे सातत्याने पाठपुरावा करून नवीन आयोग राज्यपाल यांच्या सहीने स्वाक्षरी करून घेतला आहे;ओ.बी.सी समाज्याच्या आरक्षणासाठी सदैव संकटमोचन होवून ह्या समाजाला न्याय देण्या साठी भुजबळ साहेब कटिबध्द आहे.
ओ.बी.सी आरक्षणाला नव्याने जन्म देणारा माझा नेता,आणि मिळालेल्या आरक्षणाला टिकवून ठेवणारा बापमाणूस छगनरावजी भुजबळ साहेब होय!
खरंतर साहेबांवर विकासगाथा आणि संघर्ष लिहताना आम्हा कार्यकर्त्यांना बंधन नाही; माझा नेता आहे,माझा नेत्याचा संघर्ष जनसामान्य पर्यंत पोहच व्हायला हवा, वाईट काळात आपल्या साहेबांवर खोटेनाटे आरोप झाले नाहक बदनाम करण्यात आले! सत्य चप्पल घाले पर्यंत, खोटं आख्खा गावंभर फिरलेले होते ह्यात ही सर्वच मीडिया अपप्रचार करायला पहिल्या गाडीने होती मीडिया पण जरी तुमची असली तरी सोशल मिडिया आमची आहेत.
राज्यभरातील च नव्हे तर देशभरातील ओ.बी.सी बहुजनांना नोकरी,शिक्षण,राजकारण ह्या सर्वांन मध्ये अव्वल स्थानी ताठ मानेने खुर्चीवर बसवलं ते ह्या भुजबळ नावाच्या बाप माणसाने; आरक्षणाचे आधुनिक राजर्षी शाहू महाराज म्हणजे आमचा साहेब.
आरक्षण मुद्यावर असंख्य वेळा जीवाशी खेळावा लागलं तरी देखील, तो मुद्दा कधीच सोडला नाही ह्या बाप माणसाने; काय गरज होती ह्या मुद्या वरून साहेबांना स्वतःच्या जीवनावर बितल अशी बाजू खेळण्याची? पण नाही माझा समाज शिकला पाहिजे,तो व्यापक पणाने मोठा, तो राजकारणाचा अविभाज्य भाग झाला पाहिजे ह्याचं समाजावर जीव ओतून प्रेम करणारा आरक्षण रक्षिता आमचा लोकनेता.
दीन दुबळ्या गरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांना स्कॉलरशिप सारखी सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना डॉक्टर,वकील,इंजिनियर,पोलीस आणि अन्य पदांवर आरक्षणाच्या माध्यमातून प्रत्यक्ष पोहच करणारा हा लोकनायक.
आरक्षणाच्या मुद्द्यावर ह्या माणसाने किती खस्ता,ठेचा सहन केल्या ह्या नव्याने सांगायची गरज नाही; देशाला माहीत आहे ह्या बापाने काय केलंय!ओ.बी.सी वंचित,बहुजन समाजासाठी! म्हणून ह्या बापाच्या मागे प्रत्येक ओ.बी.सी घटकाने उभे राहून हे बाहुबली हात इतके मजबूत करा की हे आरक्षणाचे मूळ कुणा केंद्राच्या दबामुळे तुटता काम नये.
केंद्र आणि राज्य सरकार ला आरक्षणाचा इम्पेरिकल डाटा सादर करण्यास भाग पाडून हे आरक्षण पूर्वरत करण्यास आमचे साहेब एकटेच समर्थ आहे; तो डाटा केंद्र सरकार ने सादर करावा.
शेवटी इतकेच की; स्तंभ, प्रत्येक वादळात काही न बोलता उभा राहतो आपल्या ओ.बी.सी परिवारावर आलेल्या संकटांवर एकटा समोर जातो; ही व्यक्ती ओ.बी.सी वंचितांना बहुजनांना न्याय हक्क देण्यासाठी केंद्राचे दरवाजे झिजवायला देखील तयार आहे कुणासाठी तर तुमच्या आमच्या न्याय हक्का साठी; स्वतः मागे अनंत अडचणी असताना डोळ्यातील अश्रू पुसून त्याच तेजोमय हास्याने पुन्हा साहेब चेहरा प्रसन्न करताय आणि प्रत्येकाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय हा बाप; ओ.बी.सी बहुजन शिक्षित अशिक्षित समाजाला हात जोडून विनंती आहे; ह्या बापाचे कष्ट चीज करायचे असेल तर एका ताकदीने गट तट संघटना विसरून फक्त लोकनेते छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मागे एका ताकदीने उभे रहा केंद्र सरकारचं काय कुणीही आपल्या आरक्षनाला हात लावणार नाही.
ओ.बी.सीं च्या राजकीय आरक्षणासाठी न्यायालयीन आणि राजकीय लढाई सुरूच राहणार आहे ही लढाई एकट्या भुजबळ कुटुंबाची नाही तर तुमची आमची आहे,त्यासाठी महापुरुषांचे विचार समाजात रुजवणे गरजेचे आहे.
ओ.बी.सी घटकाचे स्थगित झालेले राजकीय आरक्षण पूर्ववत होण्यासाठी राज्य सरकार आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची न्यायालयीन आणि राजकीय लढाई ही सुरूच राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री व समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगनरावजी भुजबळ साहेब यांनी वारंवार ओ.बी.सी ची भूमिका मांडताना व्यक्त केली आहे.
ओ.बी.सी च्या राजकीय आरक्षणाचा निर्माण झालेल्या प्रश्नाचा इतिहास भुजबळ साहेब यांनी वाचून दाखवला,भुजबळ साहेब म्हणाले की मागच्या सरकारच्या वेळेस ओ.बी.सी च्या राजकीय आरक्षणचा हा प्रश्न तयार झाला; कोर्टाने ओ.बी.सी चा इंपिरिकल डाटा मागितला असताना मागच्या सरकारने योग्य वेळी हालचाली केल्या नाही; अगदी निवडणूका तोंडावर आल्यावर इंपिरिकल डाटा मागायला सुरवात केली, मात्र केंद्राने त्यांनाही तो डेटा दिला नाही! महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले मात्र कोरोना असल्यामुळे आपण इंपिरिकल डाटा गोळा करू शकलो नाही, पण आपण न्यायालयीन लढाई सुरू ठेवली होती! न्यायालयाने जानेवारी मध्ये सांगितले की तुमच्याकडे जो डाटा आहे त्याचा अंतरिम अहवाल आयोगा मार्फत मांडा त्यासाठी राज्य सरकारने एक आयोग नेमला त्याच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांची नियुक्ती केली, त्या आयोगात अनेक सदस्यांची नेमणूक केली आणि न्यायालयाने मागितलेला डेटाचा अंतरिम अहवाल सादर केला; त्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आणि न्यायालयाने तो अहवाल फेटाळला, पण राज्य सरकार शांत बसले नाही यासाठी राज्य सरकारने आता समर्पित आयोग नेमला आहे;त्यात राज्याचे माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठीया यांची नेमणूक केली आहे यात सेवानिवृत्त आय.ए.एस अधिकारी महेश झगडे,नरेश गीते,एच.बी पटेल तसेच टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्थेचे संचालक इत्यादी लोकांची नेमणूक केली आणि हा समर्पित आयोग आता इंपिरिकल डाटा गोळा करणार आहे.
छगनरावजी भुजबळ साहेब यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की हे सगळे करत असताना निवडणुका तोंडावर आल्या होत्या, जर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक झाल्या असत्या तर त्यात ओ.बी.सी ना आरक्षण मिळालेच नसते; मात्र आम्ही एक कायदा आणला त्यात निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेचा अधिकार राज्याने आपल्याकडे घेतला आहे आणि असाच कायदा इतर राज्यांमध्ये देखील आहे, त्यामुळे जेव्हढा वेळ या प्रभाग रचनेला लागेल तेव्हढ्या वेळेत हा नवीन समर्पित आयोग इंपिरिकल डाटा गोळा करेल आणि ओ.बी.सी चे राजकीय आरक्षण पूर्ववत होईल.
वयाच्या ७५त्तरी मध्ये देखील लोकनेते छगनरावजी भुजबळ साहेब ओ.बी.सी आरक्षणाची झुंज देत आहेत;अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ही सर्वांची आहे; मागासवर्गीय समाजाला पूढे घेऊन जाणारा प्रत्येकजण हा समता परिषदे मध्ये काम करत आहे, पुणे विद्यापीठात आपण सावित्रीबाई फुले यांचा उत्कृष्ट असा पुतळा भुजबळ साहेब यांच्या संकल्पनेतून बसविला आहे; त्यात देखील अनेक अडचणी आल्या पण आपण त्या सोडविल्या आणि कार्यक्रम यशस्वी झाला, आता भिडे वाड्याचा प्रश्न भुजबळ साहेब सोडविणार आहेत याच्या अडचणी देखील शासन दरबारी सोडविणार आहेत.
नायगाव येथील शाळांचा विकास करण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला आहे, हे सर्व भुजबळ साहेब यांच्या पाठपुराव्या मुळे शक्य होत आहे हे समाजातील प्रत्येक घटकाला माहीत असणे गरजेचे आहे, त्याच प्रमाणे नायगाव येथे मुलीं साठी महाज्योती मार्फत डिफेन्स अकादमी सुरू करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून त्यासाठी २४ कोटी निधी मंजूर केला आहे; अर्थसंकल्पा मध्ये फुलेवाड्याच्या विकासासाठी १०० कोटींची तरतूद महाविकास आघाडी सरकारने केली आहे.
हे सर्व कामं करत असताना आपल्या अन्न नागरी पुरवठा ह्या मंत्री पदाला देखील साहेब न्याय देत आहे; लोक रेशनकार्ड बद्दल प्रश्न विचारतात अनेकांच्या मनात याबाबत संभ्रम निर्मान झाला आहे, सरकारने ज्यांचे उत्पन्न ग्रामीण भागात ४४ हजार आणि शहरी भागात ५९ हजार आहे त्यांनाच प्राधान्य गटातून स्वस्त धान्याचा लाभ मिळतो, राज्यातील शेवटच्या घटका पर्यंत रेशन धान्य व शिवभोजन थाळी पोहचली पाहिजे हाच ध्यास साहेबांचा आहे!
आयुष्यात सगळं काही मिळेल पण या,बापाला विसरू नका त्यांची जागा दुसरं कुणीच घेऊ शकत नाही; हा बापमाणूस म्हणजे आमच्या पिढीला लाभलेले महात्मा जोतीराव फुले यांची दुसरी छबी!
✍️✍️
कमलेश पैठणकर
No comments:
Post a Comment