विश्वासघात करणाऱ्या शासनाविरूध्द प्रखर आंदोलन करणार.
कॉ. जे पी गावीत
दि.१९ मार्च २०२२ रोजी सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा येथे कॉ जे पी गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पांडुरंग वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सहा हजार फॉरेस्ट प्लॉट धारकांचा मेळावा घेण्यात आला, या मेळाव्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी सुभाष चौधरी यांनी फॉरेस्ट प्लॉट संदर्भात प्रास्ताविक केले, त्यांनंतर जिल्हा सचिव कॉ भिका राठोड यांनी फॉरेस्ट प्लॉट च्या लढ्यासाठी संघटन मजबूत करुन शासनावर चालून जाऊन जाब विचारावा लागणार आहे , गरीब आदिवासी जनतेला वारंवार त्रास देणाऱ्या शासणाशी तालुका आणि जिल्हा स्तरावर मोठे मोर्चे आंदोलने उभारून शासनास सळो की पळो करून सोडावे लागेल. त्यांनंतर कॉ सावळीराम पवार यांनी सांगीतले की कॉ जे पी गावीत यांच्या शिवाय फॉरेस्ट प्लॉट च्या प्रश्नावर कोणीही संघर्ष करत नाही, केंद्र आणि राज्य सरकार मध्ये अनेक आमदार खाजदार आणि काही मंत्री आहेत माञ आजवर एकालाही या गरीब आदिवासी जनतेच्या फॉरेस्ट प्लॉट प्रश्नावर आवाज उठविला नाही, अशा लबाड लोकनेत्यांना गावात फिरणे मुश्किल करा. तेव्हाच यांना जनतेची किंमत कळेल, आपल्या मतदार संघातील घराणेशाहीत अडकलेले आमदार आणि खाजदार हे पदाला आणि टक्केवारीला चिकटून बसले आहेत, फॉरेस्ट प्लॉट आणि इतर प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाहीं. यांनाही धडा शिकवा, यांना त्यांची जागा दाखवा अशे आवाहन केले. कॉ जनार्दन भोये यांनी म्हटले की फॉरेस्ट प्लॉट धारकांना दोन तीन आर जमीन देऊन शासनाने जनतेची थट्टा केली आहे. दिलेल्या अत्यल्प जमीनी आणि त्या प्रमाणपत्रावर बळजबरीने कर्ज देत आहेत, हे कर्ज देउन प्रमाणपत्रावर असलेल्या दोन तीन आर जमींनीवरच आपला हक्क राहील हि गंभीर बाब आहे, हा धोक्याचा इशारा असल्याचे सांगीतले.
पंचायत समिती उपसभापती कॉ इंद्रजीत गावीत यांनी सांगीतले की सुरगाणा तालुक्यातील सोळा हजार फॉरेस्ट प्लॉट ची प्रकरणे पक्ष आणि किसान सभेच्या माध्यमातून प्रस्तावित केले त्यातील आतापर्यंत चौदा हजार वन दावे मंजूर करण्यात यश आले आहे. ही जमेची बाब लक्षात घेऊन राहिलेली प्रकरणे मंजूर करण्यासाठी तालुक्यातील जनतेने आणि युवक युवतींनी पुढाकार घेऊन आंदोलनास तयार राहावे,असे आवाहन केले
उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन करताना माजी आमदार कॉ जे पी गावीत यांनी सागितले की, गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेला वन जमीन लढा आपण सातत्याने लढतो आहोत, २००६ साली आपल्या पक्षाने काँग्रेस पक्षावर दबाव आणून वन जमीन कायदा मंजूर करून घेतला. परंतू आजही अमलबजावनीसाठी राज्य सरकार डोके हलवत नाहीं, ताब्यात असलेली आणि पिढ्यान् पिढ्या कसत असलेली हक्काची जमीन द्यायला विरोध करणाऱ्या सरकारला परत एकदा लाँग मार्च सारखा दणका द्यावा लागेल, त्याशिवाय सरकार आपली दखल घेणार नाही यासाठी तालुक्यातील सर्व फॉरेस्ट प्लॉट धारक आणि माकप च्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या संघटना मजबूत करणे गरजेच आहे. मागील लाँग मार्च मध्ये भाजप सोडून काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना व इतर सर्व राजकीय पक्षांनी आपल्याला पाठिंबा दिला, भाजपला धडा शिकवा, तुमच्या मागण्या रास्त आहेत असे पाठिंबा देताना सांगत होते, आणि आज हेचं महाविकास आघाडी चे पक्ष सत्तेत आहेत, मात्र आता त्यांचे डोळे आंधळे झालेत का असा संतप्त सवाल केला, गोर गरीब आदिवासी जणता आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरते हे शासनाला आणि लोक प्रतिनिधींना दिसत नाहीत का, गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर कामगार यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यापेक्षा देशातील आणि राज्यातील सरकार आणि मंत्री हे विविध चौकशाच्या कामात अडकले आहेत हे जनतेचे दुर्दैव आहे.
वनजमिन नावावर करण्यासाठी आणि स्वतंत्र सातबारा काढण्यासाठी आपला संघर्ष थांबणार नाही, फॉरेस्ट प्लॉट चे प्रमाणपत्र देतांना दोनशे ते अडीचशे लोकांचा एकत्र सातबारा देऊन आपल्या जनतेला फसवत आहेत, ही गंभीर बाब जनतेने लक्षात घ्यावी, मिळालेल्या प्रमाण पत्रावर इच्छा नसताना बळजबरीने कर्ज दिले जात आहे , कर्जबाजारी करून आपल्या लोकांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढवणार आणि शेतकरी संकटात टाकणार असे अनेक जीवघेणे डावपेच शासन तयार करत आहेत. हे सर्व हाणून पाडण्यासाठी येणाऱ्या काळात लाँग मार्च सारख्या तीव्र आंदोलनाची पुनरावृत्ती करावी लागेल, यासाठी तालुका जिल्हा आणि राज्यभर चळवळ उभारून पक्षाची आणि पक्षाच्या किसान सभा आणि इतर संघटना मजबुत करून एकदा मोठे आंदोलन उभारून शासणाला धडा शिकवावा लागेल यासाठी सुरगाणा तालुक्यातील जनतेने जास्तीत जास्त जनतेने संघर्षात पुढाकार घ्यावा असे आवाहन केले..
यावेळी माकप चे जिल्हा कमिटी तालुका कमिटी सदस्य, जनवादी महिला संघटना, डी वाय एफ आय संघटना कार्यकर्ते तसेच पक्षाचे कार्यकर्ते कॉम धर्मेंद्र पागरिया, सुरेश गवळी वसंत बागुल अशोक धूम, चिंता गवळी, उत्तम कडू, रामजी गावित विजय घांगळे, के डी भोये, आनंदा चव्हाण, हिरामण गावीत, राहूल गावीत, तुळशीराम खोटरे, भीमा शंकर पाटील, सुरगाणा तालुक्यातील सहा हजार नागरीक उपस्थित होते....
No comments:
Post a Comment