माळेगाव सिन्नर फाटा उड्डाणपुलाच्या भूमिपूजन सोहळा संपन्न.......... - latur saptrang

Breaking

Monday, March 21, 2022

माळेगाव सिन्नर फाटा उड्डाणपुलाच्या भूमिपूजन सोहळा संपन्न..........



 माळेगाव सिन्नर फाटा उड्डाणपुलाच्या भूमिपूजन सोहळा संपन्न..........


सिन्नर शहरात व तालुक्याच्या अवतीभवती महामार्ग व रेल्वेमार्गाचे जाळे होत असल्याने शहराला वेगळे महत्त्व प्राप्त होणार असल्याचे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले. माळेगाव सिन्नर फाटा उड्डाण पुलाच्या कामाचे भूमिपूजन खासदार गोडसे यांच्या हस्ते शनिवार दिनांक 19 मार्च 2022 रोजी करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवानेते उदय सांगळे, जि प सदस्या सौ.सुनीता सानप, शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिपक खुळे,भारत कोकाटे, राजेश गडाख, नामदेव शिंदे, संजय सानप,अशोक डावरे, आदींची उपस्थिती होती. खासदार गोडसे पुढे म्हणाले माळेगाव फाट्यावर होणारी वाहतुकीची कोंडी व होणाऱ्या अपघातामुळे या ठिकाणी भुयारी मार्ग व उड्डाणपुलाची मागणी सातत्याने होत होती, त्यामुळे केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून या कामासाठी 20 कोटी रुपये मंजूर करण्याची करण्यासाठी पाठपुरावा केला. सध्या सिन्नर-शिर्डी या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामास साठी 900 कोटी मंजूर असून ते काम प्रगतीपथावर आहे.

सिन्नर शहरातून जाणारा नाशिक पुणे महामार्ग हा गुरेवाडी पर्यंत चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असून लवकरच त्याची निविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मोह गावाजवळ महामार्गावर भुयारी मार्गाचे काम मंजुरीच्या टप्प्यात आहे. दळणवळणाच्या भरपूर सुविधा निर्माण झाल्याने सिन्नर विकसित तालुका म्हणून केंद्रस्थानी असेल असे ते म्हणाले.

यावेळी युवानेते उदय सांगळे यांनी खासदार गोडसे यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक प्रकल्प तालुक्यात होत असून कामगारांसाठी होणाऱ्या मोठ्या हॉस्पिटलचे काम लवकरच सुरू होणार असून यामुळे सिन्नर हे महत्त्वाचे केंद्र बनणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिवसेनेचे कार्यालयीन प्रमुख पीराजी पवार यांनी केली माळेगावचे सरपंच केशव सांगळे यांनी आभार मानले. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख गौरव घरटे यांचे सह सिन्नर शहर शिवसेना पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक शैलेश नाईक, , विलास शेळके, अनिल सरवार, , अरुण वाघ आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते......

No comments:

Post a Comment