निजामाबादेत महाराजांच्या पुतळ्यावरून वातावरण तापलं, दोन गटात राडा - latur saptrang

Breaking

Monday, March 21, 2022

निजामाबादेत महाराजांच्या पुतळ्यावरून वातावरण तापलं, दोन गटात राडा



 हैदराबादछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) निजामाबाद (Nizamabad Telangana) जिल्ह्यातील बोधन शहरात वातावरण तापले आहे. महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून दोन गटांत तुफान राडा झाला. दोन्ही गटांनी दगडफेक केली. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रूधुरांचा मारा केला. सध्या या शहरात तणावपूर्ण परिस्थिती आहे.

महसूल आणि महापालिका अधिकाऱ्यांकडून परवानगी न घेता एका गटाच्या सदस्यांनी शनिवारी रात्री उशिरा बोधन शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. रविवारी या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार होते. मात्र, पुतळ्याच्या अनावरणासाठी परवानगी देऊ नये, अशी मागणी करत दुसऱ्या गटातील सदस्य पुतळ्याजवळ जमले. परवानगीशिवाय पुतळा बसवण्यात आला असून ज्या पोलिस कर्मचाऱ्याने पुतळा बसविण्यास होकार दिला त्याला तत्काळ निलंबित करा, असं पुतळ्याला विरोध करणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं.

दोन्ही गटातील शेकडो सदस्य रविवारी दुपारच्या सुमारास पुतळ्याजवळ जमा झाले होते. दोन्ही गटामध्ये तुफान राडा झाला आणि एकमेकांवर दगडफेक सुरू केली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून कलम १४४ लागू केले. मात्र, जमावाने अधिक आक्रमक होत पोलिसांच्या दिशेने दडगफेक केली. त्यानंतर जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचे नळकांडे फोडले आणि लाठीचार्ज केला.

परवानगीशिवाय पुतळा बसविणे, दोन गटात दंगल घडवून आणणे, पोलिसांच्या आदेशांचे उल्लंघन करणे आणि दगडफेक करून पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणे याअतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही, असे अतिरिक्त पोलिस महासंचालक जितेंद्र यांनी सांगितले. सध्या बोधन शहरात तणावपूर्ण परिस्थिती असून कामारेड्डी आणि निर्मल जिल्ह्यातील अतिरिक्त पोलिस कुमक देखील मागविण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment