सक्षमीकरणासाठी शिवसेना सदैव महिलांसोबत उपजिल्हाप्रमुख सचिन दाने - latur saptrang

Breaking

Sunday, March 13, 2022

सक्षमीकरणासाठी शिवसेना सदैव महिलांसोबत उपजिल्हाप्रमुख सचिन दाने




 सक्षमीकरणासाठी शिवसेना सदैव महिलांसोबत 

उपजिल्हाप्रमुख सचिन दाने 
  रेणापूर/प्रतिनिधी:महिलांचे रक्षण व सक्षमीकरणासाठी शिवसेना सदैव महिलांसोबत राहील,असे प्रतिपादन शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त तालुक्यातील तत्तापुर येथे परिवर्तन संस्थेच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून सचिन दाने बोलत होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणून रेणापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक सौ.क्रांती निर्मळ,पत्रकार कोंडीराम काळे,पोहेकॉ हुंडेकरी,
हनुमंतदादा पवार,सरपंच निताताई पवार,शुभम लोखंडे,उपसरपंच लक्ष्मी नारायण गिरी,पोलीस पाटील विठ्ठल वायदंडे,सामाजिक कार्यकर्ते शुभम लोखंडे,
मोहन वायदंडे यांची उपस्थिती होती.
   परिवर्तन संस्थेचे रेणापूर तालुका समन्वयक सिद्धेश्वर वायदंडे यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.परिवर्तन संस्था जिल्ह्यातील सात तालुक्यात महिला सक्षमीकरण,शेतमजूर, विधवा,अपंग घटकांवर काम करीत आहे.
   पोलीस अधिकारी क्रांती निर्मळ यांनी महिलांवरील अन्याय,न्याय्य हक्क या विषयावर मार्गदर्शन केले.अत्याचारा विरोधात पोलीस नेहमी महिलांना सहकार्य करतील असे त्या म्हणाल्या.
  महिलांच्या सक्षमीकरणासाठी, रक्षणासाठी शिवसेना सदैव महिलांसोबत राहील. महिलांनी अत्याचार,
दारूबंदी विरोधात तसेच  शिक्षण व आर्थिक उन्नतीसाठी समोर येऊन आक्रमकपणे लढा द्यावा.
महिलाच समाजात क्रांती आणू शकतात,असे सचिन दाने यांनी सांगितले.स्त्री ही आमच्या देव्हाऱ्यातील देवता असून त्यांच्या  सन्मानासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत असे ते म्हणाले.
  या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी,
गावकरी,जिप शाळेतील विद्यार्थी व परिवर्तन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम  घेतले.
 या कार्यक्रमास ग्रामस्थ व शिवसेना पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment