मस्तच! फक्त ६ हजारात मिळतोय ४० इंचाचा ‘हा’ भन्नाट स्मार्ट टीव्ही, घरीच मिळेल थिएटरचा आनंद - latur saptrang

Breaking

Friday, March 4, 2022

मस्तच! फक्त ६ हजारात मिळतोय ४० इंचाचा ‘हा’ भन्नाट स्मार्ट टीव्ही, घरीच मिळेल थिएटरचा आनंद

 


मस्तच! फक्त ६ हजारात मिळतोय ४० इंचाचा ‘हा’ भन्नाट स्मार्ट टीव्ही, घरीच मिळेल थिएटरचा आनंद


नवी दिल्ली : ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर आजपासून Big Bachat Dhamaka Sale सुरू झाला आहे. ४ मार्चपासून सुरू झालेला हा सेल ६ मार्चपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये तुम्ही स्मार्टफोन्स, स्मार्ट टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सला धमाकेदार डिस्काउंटसह खरेदी करू शकता. फ्लिपकार्टच्या या सेलमधून तुम्ही महागड्या स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदी करू शकता. तुम्ही जर टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Flipkart चा हा सेल तुमच्या फायद्याचा ठरेल. या सेलमध्ये KODAK च्या ४० इंच स्मार्ट टीव्हीला तुम्ही खूपच कमी किंमतीत घरी नेऊ शकता. सेलमध्ये आकर्षक ऑफर्ससह मिळणाऱ्या या टीव्हीविषयी सविस्तर जाणून घेऊया.



KODAK 7X Pro 40 inch Full HD LED Smart TV वर आकर्षक ऑफर्स

KODAK 7X Pro 40 inch Full HD LED Smart TV ची मूळ किंमत २०,९९९ रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या सेलमध्ये हा टीव्ही फक्त १८,४९९ रुपयात उपलब्ध आहे. म्हणजेच, टीव्हीवर ११ टक्के डिस्काउंटचा फायदा मिळत आहे. याशिवाय अनेक बँक आणि एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ मिळत आहे. त्यामुळे टीव्हीची किंमत खूपच कमी होईल. KODAK या स्मार्ट टीव्हीवर ५ टक्के अतिरिक्त डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे ९२५ रुपये अजून कमी होतील. याशिवाय, पेटीएम वॉलेट, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास ५५० रुपयांचा कॅशबॅक देखील मिळेल. अशाप्रकारे टीव्हीची किंमत १७,०२४ रुपये होईल.

KODAK 7X Pro 40 inch Full HD LED Smart TVवर एक्सचेंज ऑफर

KODAK 7X Pro 40 inch Full HD LED Smart TV वर जबरदस्त एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळत आहे. या टीव्हीवर ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आहे. तुम्ही जुना टीव्ही दिल्यास या ऑफरचा लाभ मिळेल. मात्र, ही ऑफर जुन्या टीव्हीच्या मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. तुमचा टीव्ही जर लेटेस्ट असल्यास ऑफरचा जास्तीत जास्त फायदा होईल. ऑफरचा संपूर्ण लाभ मिळाल्यास KODAK च्या टीव्हीला फक्त ६,०२४ रुपयात खरेदी करता येईल. दरम्यान, आजपासून सुरू झालेला Flipkart Big Bachat Dhamaka Sale ६ मार्चपर्यंत चालणार असून, यात स्मार्ट टीव्हीसह अनेक प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर्स मिळत आहेत.

No comments:

Post a Comment