'लवकरच मोठा खुलासा', पटोलेंच्या ट्वीटने राजकीय वातावरण तापणार? - latur saptrang

Breaking

Friday, March 4, 2022

'लवकरच मोठा खुलासा', पटोलेंच्या ट्वीटने राजकीय वातावरण तापणार?



'लवकरच मोठा खुलासा', पटोलेंच्या ट्वीटने राजकीय वातावरण तापणार?


मुंबई : सध्या तपास यंत्रणांच्या कारवायांमुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी वारंवार मोदी सरकारवर आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. आज सकाळी त्यांनी ट्विट करून लवकरच मोठा खुलासा करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता नाना पटोले कोणाविरोधात बॉम्ब फोडणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सची छापेमारी झाली. त्यामुळे भाजप तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. ईडीने काही दिवसांपूर्वी नवाब मलिकांवर कारवाई केली. त्यांच्या ईडी कोठडीत गुरुवारी पुन्हा वाढ करण्यात आली. दाऊदच्या माणसाकडून जमीन विकत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देखील तसे आरोप केले होते. त्यानंतर ईडीने ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. 

No comments:

Post a Comment