Nuclear Power Plant : रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील न्युक्लियर पावर प्लांटला आग, रेडिएशन लीक होण्याची भिती - latur saptrang

Breaking

Friday, March 4, 2022

Nuclear Power Plant : रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील न्युक्लियर पावर प्लांटला आग, रेडिएशन लीक होण्याची भिती

 

Nuclear Power Plant : रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील न्युक्लियर पावर प्लांटला आग, रेडिएशन लीक होण्याची भिती


कीव्ह;  रशियाची युक्रेनवर मागच्या ९ दिवसांपासून लष्करी कारवाई सुरूच आहे. युक्रेनच्या कित्येक शहरांवर रशियांच्या सैन्याने ताबा घेतला आहे. दरम्यान युक्रेनमधील झापोरिझ्झ्या न्युक्लियर पावर प्लांटमध्ये आग लागल्याची माहिती समोर आली आहे. (Zaporizhzhia Nuclear Power Plant)

रशियाचे सैन्य युक्रेनमधील युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा केंद्रावर गोळीबार करत आहे. रशियाने ही कारवाई लवकरात लवकर थांबवावी असे आवाहन एनेरहोदर शहराचे येथील प्लांटचे प्रवक्ते अँड्री तुझ यांनी टेलिग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमधून केले आहे.

दरम्यान, युरोपमधील सर्वात मोठ्या अणुऊर्जा केंद्रामध्ये आण्विक धोका होण्याची भिती त्यांनी व्यक्त केली आहे. युक्रेनच्या वीजनिर्मितीपैकी सुमारे एक चतुर्थांश ऊर्जा निर्मितीया प्लांटमध्ये होते. तुझ पुढे म्हणाले की, झापोरिझ्झिया प्लांटवर थेट गोळीबार होत असल्याने काही भाग कोसळत आहे. दरम्यान ६ अणुभट्ट्यांपैकी एकाला आग लागली आहे. ज्या अणुभट्टीला आग लागलीय त्याचे दुरूस्तीचे काम सुरू असल्याने ती सद्यस्थितीत बंद आहे.

परंतु गोळीबार सुरू असलेल्या त्या ठिकाणी रेडिएशन लीक होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. असे तुझ यांनी सांगितले. अग्निशमन दलाचे जवान आगीजवळ जाऊ शकत नाहीत कारण त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता असल्याचेही तुझ यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment