मुंबईः शासकीय निवासस्थान बदलून देण्याकरिता लागणारे शिफारसपत्र अंधेरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात पाठविण्याकरिता अर्जदाराकडे १० हजारांची लाच मागून ती रक्कम स्वीकारताना अॅण्टिकरप्शन ब्युरोच्या पथकाने वांद्रे येथील उपअभियंता कार्यालयातील वरिष्ठ लिपिक प्रज्ञा भोसले यांना रंगेहाथ पकडले.
किरण (नाव बदलेले) हे गेल्या १५ वर्षांपासून वांद्रे येथील शासकीय निवासस्थानात राहत आहेत.
त्यांनी निवासस्थान बदलून मिळावे याकरिता भोसले या कार्यरत असलेल्या कार्यालयात अर्ज केला होता.
त्यानंतर निवासस्थान बदलून मिळावे यासाठी किरण पाठपुरावा करत होते.
शासकीय निवासस्थान बदलून देण्याकरिता लागणारे शिफारसपत्र अंधेरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात पाठवावे लागेल असे सांगून त्याकरिता भोसले यांनी १० हजार रुपयांची मागणी केली.
लाच द्यायची नसल्याने किरण यांनी अॅन्टीकरप्शन ब्युरोकडे तक्रार केली.
त्यानुसार १० हजारांची लाच स्वीकारताना प्रज्ञा भोसले यांना अॅन्टीकरप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
No comments:
Post a Comment