अहमदपूर महावितरणचा अनागोंदी कारभार
ग्रामस्थांची गैरसोय ः लाखावर पैसे भरूनही डी.सी.बसेनालातूर 14-03-2022
अहमदपूर तालुक्यातील मौजे मेथी येथील ग्रामस्थांची गैरसोय होत असल्यामुळे ग्रामस्थांच्या सोयीसाठी व दहावी बारावीच्या परीक्षा सुरू असल्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा विचार करून गावातील लाईट सुविधेसाठी दीड लाख रूपये पैसे भरूण डी.पी.ची मागणी केली. बर्याच पाठपुराव्यानंतर डी.पी.गावात आला. परंतु तो डी.पी.बसविण्यासाठी लागणारी महावितरची यंत्रणा मात्र अद्यापही उपलब्ध झाली नसल्यामुळे ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
अहमदपूर तालुक्यातील मेथी हे दीड हजार लोकसंख्येचे गाव पंरतु या छोट्याशा गावात म्हणाव्या तशा सुविधा मिळत नाहीत. प्रत्येक गावातील नागरिकांच्या मागण्यामध्ये लाईट, रस्ते आणि पाणी या गोष्टी महत्वाच्या आहेत. पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात आटोक्यात आहे. परंतु रस्ते आणि वीज प्रश्नांबाबत मात्र नागरिकांची कायम अडचणी आहेत. गावातील विजेचा प्रश्न गंभीर होत असल्यामुळे गावातील ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयाकडे दीड लाख रूपये भरून गावातील गावठान जमीनीवर डी.पी.बसविण्याची मागणी केली. अनेक महिण्याच्या पाठपुराव्यानंतर डी.पी.गावात आलाही पंरतु तो डी.पी. बसविण्यासाठी लागणारी महावितरणची यंत्रणा अहमदपूर विभागाचे अभियंता जिलानी शेख व काळे यांनी उपलब्ध करून दिलेली नाही.
त्यामुळे मेथी गाव व परिसरातील नागरिकांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. सततच्या पाठपुराव्यानंतरही डी.पी.वेळेत बसविला जात नसल्यामुळे महावितरणचा अनागोंदी कारभार यातून समोर आला आहे. त्यामुळे याबाबत महाविरणच्या अहमदपूर कार्यालयातील वरीष्ठ अधिकार्याने मेथी गावातील डी.पी.चा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अन्यथा डी.पी.उभारणीासाठी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. असा ईशाराही त्यांनी दिलेला आहे.
No comments:
Post a Comment