*आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नाने प्रदीर्घ संघर्षाला न्याय मिळाला......*
मनमाड शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी मनमाड येथील आण्णाभाऊ साठे विचार मंचच्या माध्यमातून गेल्या 30 वर्षांपासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा मनमाड शहरात व्हावा यासाठी संघर्ष सुरू होता.
या पुतळ्यासाठी आरक्षित जागेवर दहा वर्षांपासून चबुतरा स्मारकासाठी प्रतीक्षेत होता.
मनमाड शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे, पुण्यतिथीचे, सांस्कृतिक कार्यक्रम या चबुतऱ्यावर संपन्न होत असतात. यासाठी अनेक राजकीय सामाजिक चळवळी चालू होत्या. परंतु सदरील विषय हा कायमचा दुर्लक्षित राहिला आहे.
यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार मंच संस्थापक मुरलीधर ससाने, अध्यक्ष लक्ष्मण थोरात (पटेल), सचिव यशवंत बागुल, प्रभानंद खैरनार, समाधान त्रिभुवन, धनंजय अवचारे, मनोज ससाने, सचिन कांबळे यांनी नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या नाशिक येथील निवासस्थानी भेट घेतली आणि सदर विषय आमदार साहेबांकडे मांडला असता आमदार सुहास अण्णा कांदे यांनी संपूर्ण विषय ऐकून घेतल्यानंतर त्वरित निर्णय घेत शिल्पकार श्रेयस गर्गे यांना बंगल्यावर बोलावून घेतले आणि अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बनविण्यासाठी सूचना केल्या. सोबतच शिल्पकार श्रेयस दर्गे यांना त्वरित अनामत रक्कम सुपूर्द करत लवकरात लवकर पुतळ्याचे काम पूर्ण करण्यासाठी विनंती केली. अशाप्रकारे नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून गेल्या कित्येक दिवस प्रलंबित आणि प्रतीक्षेत असलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याची लवकरच मनमाड शहरांमध्ये स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आणि यामुळे मनमाड शहरातील सर्व बहुजन समाजात मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त केला जात आहे. आमदार साहेबांच्या माध्यमातून या प्रकरणाला न्याय मिळाल्याची भावना प्रत्येक जण व्यक्त करत आहे.
नाशिक येथील भेटीप्रसंगी शिवसेना जिल्हा उपप्रमुख संतोष भाऊ बळीद, शहर प्रमुख मयूर बोरसे, जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड, युवासेना जिल्हाधिकारी फरानदादा खान, युवासेना उप जिल्हाधिकारी मुन्नाभाऊ दरगुडे, उपप्रमुख दिनेश घुगे, समाजसेवक सुनीलभाऊ हांडगे, सचिन दरगुडे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment