धोडप किल्ला आणि परिसराच्या पर्यटन विकासासाठी सदैव कटिबद्ध शिवसेना नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांचे प्रतिपादन - latur saptrang

Breaking

Wednesday, March 9, 2022

धोडप किल्ला आणि परिसराच्या पर्यटन विकासासाठी सदैव कटिबद्ध शिवसेना नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांचे प्रतिपादन



 धोडप किल्ला आणि परिसराच्या पर्यटन विकासासाठी सदैव कटिबद्ध शिवसेना नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांचे प्रतिपादन


पर्यटनमंत्री आदित्य साहेब ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर धोडप किल्ला आणि परिसर पर्यटन विकास कसा साधता येईल यानिमित्ताने नाशिक जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह धोडप किल्ला आणि परिसराची पाहणी दिनांक सात मार्च रोजी केली त्यावेळी त्यांनी किल्ल्या वर स्वतः जाऊन किल्ल्यावरील पुरातन वास्तूंचे अतिशय सूक्ष्मपणे निरीक्षण केले व टिपणे काढून घेतली. या अतिशय परिश्रमपूर्वक अभ्यासानंतर येथील पर्यटन केंद्रात परिसरातील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या पर्यटन केंद्र धोडप आणी परिसरातील पर्यटन केंद्रांचा विकासासंदर्भात अपेक्षा जाणून घेतल्या त्यानंतर पर्यटन संदर्भात त्याचप्रमाणे धोडप किल्ल्याचे पावित्र्य राखत कशा प्रकारे विकास करता येईल व पर्यटकांसाठी जास्तीत जास्त सोयी सुविधा कशा प्रकारे उपलब्ध करून देता येतील कोणकोणत्या सुविधा तयार करता येतील याविषयी चा सविस्तर आराखडा तयार करण्यात येईल त्याचप्रमाणे पर्यटन केंद्र तर धोडप किल्ल्याचा पायथा पर्यंत रस्ता तसेच  हट्टी गावाला जोडणारे सर्व रस्त्यांचा विकास कोणत्या योजनेतून साकारण्यात येईल याविषयी सखोल अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन भाऊसाहेब चौधरी यांनी उपस्थितांना दिली त्याचप्रमाणे पर्यटनमंत्री सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे यांच्या दौऱ्याआधी धोडप किल्ल्याचे स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल असेही ते म्हणाले.

         कुठलाही अभ्यास दौरा हा निव्वळ औपचारिक न राहता तो अभ्यासपूर्ण व मनापासून व्हायला हवा याविषयी संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी  सदैव सजग असतात त्याचा प्रत्यय त्यांनी स्वतः धोडप किल्ला सर करून इतरांना दिला त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन इतरही पदाधिकारी अशाच प्रकारे आगामी निवडणुकांमध्ये काम करतील अशी चर्चा सर्व शिवसेना समर्थकांमध्ये होत आहे. मोजक्याच पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित करण्यात आलेली धोडप किल्ला निरीक्षण दौऱ्यात चौधरी यांनी किल्ल्यावर कुठल्याही प्रकारची अस्वच्छता होणार नाही याची विशेष काळजी घेतली रिकाम्या पाणी बॉटल  त्याचप्रमाणे वर्तमानपत्रांचे कागद लागलीच जमा करण्याची  व त्याची पर्यावरणाला हानी न करता विल्हेवाट लावण्याची सुचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिली व आपण सदैव आपल्या महाराष्ट्राचे संस्कृती जतन करताना कायम  काळजी घेतली पाहिजे असा संदेशही  त्यांनी या वेळी दिला.

         ‌ अतिशय उत्साहाच्या वातावरणात मध्ये ‌ आई भवानी ,छत्रपती शिवराय, हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, यांच्या जयघोषाने यावे धोडप आणि परिसर दुमदुमून गेला होता.

        या परिसर पाहणी दौऱ्यात उपजिल्हाप्रमुख नितीन दादा आहेर ,तालुकाप्रमुख विलास भाऊ भवर, उपतालुकाप्रमुख संतोष मोहन , विकास भुजाडे, कानमंडळे ग्रामपंचायतीचे सरपंच संजय महाराज शिंदे ,दादा भाऊ अहिरे ,नारायण शिंदे, संपत जाधव,विजय रकिबे, उपसरपंच निरभवणे ,बाळासाहेब बोरसे, बापू शिरसाट, घमाजी राजे सोनवणे,  सरचिटणीस चांदवड तालुका शिक्षक सेना सरचिटणीस सतीश पाटील , नवनाथ भवर, प्रमोद उशीर , अशोक शिंदे,समाधान शेळके , हट्टी सरपंच, निलेश परदेशी, सचिन परदेशी,उपसरपंच, तुषार बोरसे, भूषण बोरसे, मगेश बोरसे, त्याचप्रमाणे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment