सामाजिक संघटना व समाज एक संघ होऊन नेत्यांना पाठिंबा भक्कम राहावे त्यामुळे बळ हवे
भास्करराव आंबेकर
जालना
भुजबळसो ओबीसीचे नेते आज त्यांच्या पाठीशी सर्वजण भक्कम असले तर प्रश्न मार्गी लागेल
मनोज जी घोडके
औरगाबाद
सावित्री शक्तीपीठच्या उत्तम कार्यासाठीच सावित्रीच्या लेकिंना बळ द्या
दशरथ कुळधरण
पुणे
औरंगाबाद येथे सावित्री शक्तीपीठ चे पदाधिकारी यांचे जंगी स्वागत झालेत. त्यावेळी अध्यक्ष मनोजजी घोडके म्हणाले आज ओबीसी व माळी समाजाचे भरपूर प्रश्न आहे ते सोडविण्यासाठी त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहावे तर औरंगाबाद येथे समाजासाठी लवकरच जागा घेऊन वास्तु उभे करणार असे मनोजजी घोडके म्हणाले तर प्रमुख पाहुणे भास्कराराव आंबेकर म्हणाले की राजकीय व सामाजिक टीम वेगळी असावी आणि राजकीय मंडळी ना सामाजिक व समाजाने साथ दिली तर नेते उत्तम कार्ये करतील. आज सावित्रीच्या लेकी उत्तम कार्य करतात त्यांचे अभिनंदन अभिनंदन
सावित्रीच्या लेकिंना बळ द्या त्याच समाजासाठी उत्तम कार्ये करतील सर्व शाखा विसरून माळी म्हणून एकत्रित काम करणे गरजेचे आहे. माळी समाजात विष पेरणे थांबवा. सर्वानीच एकत्रित लढा द्यावा. इतर समाजाचे उत्तम गुण घेऊन आपला विकास करा असे दशरथ कुळधरण यांनी सांगितले. सौ तनुजा जाधव इतर मान्यवर मंडळी च्या शुभहस्ते पुढील पुरस्कारथी नावे
1 मा सावतामाळी विद्यार्थी वसतिगृह औरंगपुरा, ट्रस्ट औरंगाबाद.
2 श्री व सौ अनिताताई जयवंतराव गायकवाड, औरंगाबाद
3 सौ. पार्वतीबाई शिरसाट, औरंगाबाद
4 श्री. मिर्जा अब्दुल कयूम नदवी राष्ट्रीय प्रवक्ता ऑल इंडिया, मुस्लिम ओ बी सी ऑर्गनायझेशन, औरंगाबाद
5 सौ. अनिताताई देवतकर, औरंगाबाद
6 सौ. सुनीता शिंदे, मराठी चित्रपट निर्मात्या स. सो. खंडाळकर जेष्ठ पत्रकार, औरंगाबाद.
महिला उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती कार्यक्रमासाठी
550 श्रोते वर्ग उपस्थित होते. त्यात अनेक मान्यवर होते.
पुण्यातून सावित्री शक्तीपीठच्या मान्यवर व्यवस्थापक सौ सुवर्णा कोरे सांगली, सौ सुमन अडसूळ नायगाव, सौ माधुरी जाधव लोहगाव यांना सन्मानित करण्यात आले.
औरंगाबादच्या पुर्ण टीमने उत्तमने नियोजन केले त्याबद्दल मा दशरथ कुळधरण आण्णासाहेब यांनी अभिनंदन करून धन्यवाद दिलेत.
तनुजा जाधव अध्यक्ष
सावित्री शक्तिपीठ औरंगाबाद
No comments:
Post a Comment