अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकावरून सांगलीत राजकारण तापलं
मागील काही दिवसांपासून सांगलीत अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाचा विषय चांगलाच गाजला आहे. सध्या सांगलीत या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली आहे. याप्रकरणी आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरूच आहे. राष्ट्रवादीने 2 एप्रिल २०२२ ला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते अहिल्यादेवी स्मारकाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे.
यावेळी पडळकर म्हणाले, संचारबंदी लागू केली तरी 27 मार्चला अहिल्यादेवी होळकर स्मारकाचं उद्घाटन मेंढपाळांच्या हस्ते करणार आहे. मला रोखण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील सर्वोपरी प्रयत्न करणार आहेत. तुमच्यात धमक आहे तर कार्यकर्ते पाठवा, कोणत्या पातळीला जाऊन हे राजकारण करत आहात, असा सवालही त्यांनी केला आहे. शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण होऊ देणार नाही. याला आमचा विरोध आहे. हे प्रकरण चिघळू देऊ नका, अशी आवाहनही त्यांनी पोलिस दल आणि प्रशासनाला केलं आहे.
No comments:
Post a Comment