चांगली पुस्तके आणि माणसांमुळे आयुष्य घडते -डॉ. पांडुरंग शितोळे - latur saptrang

Breaking

Sunday, March 13, 2022

चांगली पुस्तके आणि माणसांमुळे आयुष्य घडते -डॉ. पांडुरंग शितोळे

 चांगली पुस्तके आणि माणसांमुळे आयुष्य घडते

-डॉ. पांडुरंग शितोळे

लातूर, मार्च १२

विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरमध्ये चांगले मित्र जोडून त्यांची संगत केली पाहिजे. कारण चांगली पुस्तके व चांगली माणसे मिळाली तर आपल्या आयुष्यात चांगला सुगंध दरवळतो आणि यातूनच आपले आयुष्य घडत असते असे प्रतिपादन श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालयाचे प्रा. डॉ. पांडुरंग शितोळे यांनी दहावी वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात केले.

मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित रोकडेश्वर विद्यालयात शनिवारी इयत्ता दहावी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रा. डॉ. पांडुरंग शितोळे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बाजीराव पाटील होते.

पुढे बोलताना प्रा. डॉ. शितोळे म्हणाले की, जीवनात कोणत्याही बाबींची निवड करताना निवड योग्यच करावी, निवड चुकली की आयुष्य दुखी बनते. म्हणून नेहमी चांगल्या माणसांच्या आणि पुस्तकांच्या संगती मध्ये राहून विद्यार्थ्यांनी चांगलाच विचार केला पाहिजे. वाईट विचार केला तर आपल्या हातून वाईट कृती कृती घडते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजय देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन संतोष जाधव यांनी केले.
निरोप समारंभाला दहावीचे विद्यार्थी शिक्षक, कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment