शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्‍सवी पत्रकार कल्‍याण निधीमध्ये १५ कोटींची भर कल्‍याण निधी आता ५० कोटींवर - latur saptrang

Breaking

Friday, March 11, 2022

शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्‍सवी पत्रकार कल्‍याण निधीमध्ये १५ कोटींची भर कल्‍याण निधी आता ५० कोटींवर



 शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्‍सवी पत्रकार कल्‍याण निधीमध्ये १५ कोटींची भर


कल्‍याण निधी आता ५० कोटींवर


आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेंतर्गत स्‍वर्गीय शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्‍सवी पत्रकार कल्‍याण निधीच्या व्याजातून ज्‍येष्‍ठ पत्रकारांना सन्मान योजना राबविण्यात येते.या निधीमध्ये भरीव वाढ करण्यात यावी अशी मागणी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने केली होती.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निधीत १५ कोटींची भर घालण्यात आल्‍याची घोषणा अर्थसंकल्‍पात केली आहे.यामुळे ज्‍येष्‍ठ पत्रकारांना निवृत्‍तीवेतन मिळणे अधिक सुकर होणार आहे.गेल्‍या वर्षीही वार्ताहर संघाच्या मागणीवरून अर्थसंकल्‍पात १० कोटींची घोषणा करण्यात आली होती.आजच्या या घोषणेमुळे हा निधी ५० कोटींपर्यंत पोहोचला आहे.कोरोनाच्या कठिण काळात राज्‍याच्या अर्थव्यवस्‍थेसमोर मोठे आव्हान असतानाही ज्‍येष्‍ठ पत्रकारांना निधी उपलब्‍ध करून दिल्‍याबददल मुख्यमंत्री उदधव बाळासाहेब ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनःपूर्वक आभार

No comments:

Post a Comment