युवानेते कुणाल गायकवाड यांनी शेतकऱ्याचे चोरी झालेले ११ लाख रुपये परत मिळवून दिले...! - latur saptrang

Breaking

Sunday, March 20, 2022

युवानेते कुणाल गायकवाड यांनी शेतकऱ्याचे चोरी झालेले ११ लाख रुपये परत मिळवून दिले...!



 युवानेते कुणाल गायकवाड यांनी शेतकऱ्याचे चोरी झालेले ११ लाख रुपये परत मिळवून दिले...!                                                  ड्रायव्हर झाला होता रक्कम घेऊन फरार                                             बुलढाणा

दिनांक १६ मार्च २०२२ रोजी रात्री १०.३० ते ११.०० च्या सुमारास सोयाबीन विकून परत येत असताना वाहनावरील ड्रायव्हर शेतकऱ्याचे अकरा लाख रुपये घेऊन फरार झाला होता. याची माहिती कुणाल गायकवाड यांना मिळताच त्यांनी सर्वत्र नाकेबंदी करून रातोरात फरार चालकाचा शोध घेवून त्‍याला दहा लाख रुपये सह पकडले. त्यामुळे शेतकरी परिवारात उत्साहाचे वातावरण आहे.                      

काही दिवसापूर्वी अंभोडा येथील शेतकरी शंकर तायडे हा आपली सोयाबीन विकण्यासाठी बाहेरगावी गेले होतेसोयाबीन विकून त्याला तब्बल अकरा लाख रुपये मिळाले होते.* परत येत असताना मेहकर फाटयावर तायडे व वाहन चालक दोघे जेवन करण्यासाठी एका हॉटेलवर थांबले. यावेळी वाहनात सदर रक्कम ठेवली असल्याची माहिती ही चालकास होती. त्‍यामुळे वाहन चालकांने लगेच जेवन उरकून वाहनात येवून बसला. इकडे शंकर तायडे जेवन करीत असतांनाच वाहन चालकाने सदर रक्कम घेवून पोबारा केला.  या घटनेची माहिती होताच शेतकऱ्यावर संकटाचे आस्मान कोसळले. या रुपयातुन तायडे यांनी वर्षभराचे विविध  नियोजन केले होते, आणि आता आपल्या हातात काहीच नाही हे विचार करुन तो गर्भगळीत झाला होता. याच वेळी अचानक त्याच्या डोक्यात अचानक युवानेते कुणाल गायकवाड यांचे नाव आले आणि त्याने लगेच फोन करून युवानेते कुणाल गायकवाड यांना घडलेली घटना सांगितली तसेच फरार चालक हा मोताळा च्या दिशेने गेला असल्याचे सांगितले.  यावर युवानेते कुणाल गायकवाड यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना व स्वीय सहायक ज्ञानेश्वर वाघ यांना ही घटना सांगितली, तालुक्यातील सर्वच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना गाडीचा नंबर पाठविला व  शोधाशोध  केली.  तालुक्यातील सर्व मुख्य रस्ते शिवसैनिकांनी ठिकठिकाणी बंद केले. दरम्यान  रात्री अकरा वाजता ही गाडी तालुका प्रमुख रामदास चौथनकर व स्विय सहाय्यक ज्ञानेश्वर वाघ तसेच कार्यकर्त्यांनी धामणगाव बढे येथे अडवली. वाहन चालकाची चौकशी केली असता प्रारंभी त्‍याने उडवा उडवीची उत्‍तरे दिली. त्‍याची झडती घेतली असता त्‍याच्या जवळ ११ लाख रुपये आढळून आले.  हे पैसे जप्त करून ज्ञानेश्वर वाघ,रामदास चौथनकर व कार्यकर्त्यांनी संबंधित शेतकऱ्याला परत केले. कुणाल  गायकवाड यांच्या सतर्कतेमुळे या शेतकऱ्याला पैसे परत मिळाले. या प्रसंगी त्याठिकाणी रामशंकर सोनोने, सचिन हिरोळे, गणेश राजस, उमेश माळी,व कार्यकर्ते उपस्थित होते.


शेतकरी परिवाराने भावी नेत्‍यास दिला आशिर्वाद शेतक-याची हातातून गेलेली रक्कम परत मिळाल्याने तायडे यांच्या परिवाराचा आनंद ओसांडून वाहत असल्याचे दिसून आले. आज सकाळी शेतकरी शंकर तायडे याने आपल्या परिवारासह परिसरातील इतर शेतक-यांना घेवून आमदार संजय गायकवाड यांचे कार्यालय गाठले. या ठिकाणी तायडे यांनी आमदार संजय गायकवाड व कुणाल गायकवाड यांची कृतज्ञता व्यक्त करुन त्‍यांचा सत्‍कार केला, तसेच या सारखी शेकडो शेतक-यांची सेवा कुणाल गायकवाड यांच्याकडून घडो असे आशिर्वाद देत  त्‍यांना भविष्यातील यशस्वी  नेता होण्याचा आशिर्वाद ही दिला....!

No comments:

Post a Comment