Blast In Pakistan : सियालकोट लष्‍कर छावणी परिसर साखळी स्‍फोटाने हादरला - latur saptrang

Breaking

Sunday, March 20, 2022

Blast In Pakistan : सियालकोट लष्‍कर छावणी परिसर साखळी स्‍फोटाने हादरला



उत्तर पाकिस्‍तानमधील सियालकोट लष्‍कर छावीत आज सकाळी भीषण स्‍फोट झाला. ( Blast In Pakistan ) सलग झालेल्‍या स्‍फोटांमध्‍ये हा संपूर्ण परिसर हादरला आहे. हे स्‍फोट एवढे भीषण होते की, पंजाब प्रांतातील छावणीतही याची माहिती मिळाली, अशी माहिती द डेली मिलाप या दैनिकाने ट्‍विटरच्‍या माध्‍यमातून दिली. या परिसरात शस्‍त्रसाठा भांडार असून यालाच आग लागली असल्‍याचा संशय व्‍यक्‍त होत आहे. या दुर्घटनेचे कारण अद्‍याप स्‍पष्‍ट झालेले नाही.

Blast In Pakistan :बंडखाेरांचा हल्‍ला की दुर्घटना?

सियालकोट लष्‍कर छावणीत झालेल्‍या साखळी स्‍फोटांमुळे जिवित वा वित्त हानीची माहिती अद्‍याप समोर आलेल नाही. मात्र सोशल मीडियावर व्‍हायरल होत असणार्‍या व्‍हीडीओमुळे मोठे नुकसान झाले असल्‍याचा अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे. बलुच बंडखोरांकडून या परिसराला नेहमी लक्ष्‍य केले जाते. त्‍यामुळे हा बंडखोराचा हल्‍ला की दुर्घटना याचा तपास सुरु आहे.

सोशल मीडियावरील व्‍हायरल व्‍हिडीओ सियालकोट लष्‍कर छावणी परिसर आगीत विळख्‍यात सापडल्‍याचे दिसत आहे. चारही बाजूंनी आगीचे लोट उठत असल्‍याने परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. पाकिस्‍तानच्‍या लष्‍कराने या घटनेबाबत अद्‍याप माहिती दिलेली नाही.

No comments:

Post a Comment