कोपरगाव शहरात आज पोलीस स्टेशन इमारत, बस स्थानक इमारत व पंचायत समिती कार्यालय इमारतीचे लोकार्पण उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या शुभहस्ते व गृहमंत्री मा.ना.श्री. दिलीपरावजी वळसे पाटील व ग्रामविकासमंत्री मा.ना.श्री. हसनजी मुश्रीफ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मा.श्री. अशोकदादा काळे होते.
यावेळी बोलताना कोपरगाव मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी निधीचा ओघ सुरूच राहील व नामदार मा.श्री. आशुतोषदादा काळे कोपरगाव मतदारसंघाचा कायापालट केल्याशिवाय राहणात नाही असा विश्वास ना.मा.श्री. अजितदादा पवार साहेब यांनी व्यक्त केला. नामदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी मागणी केल्याप्रमाणे कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी ४ कोटी रुपये व पोलीस वसाहतीसाठी २१ कोटी रुपये निधी मंजूर केला तसेच बस स्थानकावर बीओटी तत्वावर गाळे सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असून कोपरगाव शहरात भूमिगत गटारी करण्यासाठी व इतर विकासकामांसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.
यावेळी बोलताना गृहमंत्री मा.ना.श्री. दिलीपरावजी वळसे साहेब म्हणाले की नामदार मा.श्री. आशुतोषदादा काळे हे माजी खासदार स्व. शंकररावजी काळे साहेब व माजी आमदार मा.श्री. अशोकदादा काळे यांचा जनसेवचा वारसा समर्थपणे चालवत असून कोपरगाव मतदारसंघाच्या विकासाच्या जबाबदारीबरोबरच सहकार क्षेत्रातील तसेच रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मिळालेली शिक्षण क्षेत्रातील जबाबदारी ते समर्थपणे पार पाडत आहेत असे प्रतिपादन केले.
कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून व पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून नामदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या मागणीनुसार ग्रामीण भागाच्या विकासासाठी आजवर भरगोस निधी दिला असून इथून पुढेही निधी कमी पडणार नाही असे आश्वासन ग्रामविकास तथा पालकमंत्री मा.ना.श्री. हसनजी मुश्रीफ साहेब यांनी दिले असून पुढील अडीच वर्षात आशुतोषदादा कोपरगाव मतदारसंघ 'चकाचक' करून टाकतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.ना.सौ. राजश्रीताई घुले, खासदार मा.श्री. सुजयदादा विखे पाटील, आमदार मा.श्री. सुधीरजी तांबे साहेब, आमदार मा.श्री. किशोरजी दराडे, माजी आमदार मा.श्री. चंद्रशेखरजी घुले साहेब, मा.श्री. दादाभाऊजी कळमकर साहेब, मा.श्री. भानुदासजी मुरकुटे साहेब, मा.श्री. पांडुरंगजी अभंग साहेब, मा.श्री. भाऊसाहेबजी चिकटगावकर साहेब, मा.श्री. जयंतजी जाधव साहेब, विभागीय आयुक्त श्री. राधाकृष्णजी गमे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्रजी भोसले, पोलीस उपायुक्त श्री. बी.जी. चंद्रशेखर पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजजी पाटील, रयत शिक्षण संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्य सौ. मीनाताई जगधने, संगमनेरच्या नगराध्यक्षा मा.सौ. दुर्गाताई तांबे, श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त कु. अनुराधाताई आदिक, श्री. अनिलराव शिंदे, सौ. स्नेहलताताई शिंदे, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे, डॉ. मेघनाताई देशमुख, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे, श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त डॉ. एकनाथजी गोंदकर, श्री. अविनाशजी दंडवते, श्री. सुहासजी आहेर, श्री. सुरेशजी वाबळे, श्री. सचिनजी गुजर, श्री. महेंद्रजी शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्री. अविनाशजी आदिक, जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्रजी फाळके, कार्याध्यक्ष श्री. संदीपजी वर्पे, शिवसेना जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्रजी झावरे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष श्री. कपिलजी पवार, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. तुषारजी पोटे, कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री. कारभारीनाना आगवण, उपाध्यक्ष श्री. नारायणराव मांजरे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्री. सुधाकरराव रोहोम, आजी - माजी संचालक, जिल्हा परिषद पंचायत समितीचे आजी - माजी सदस्य, आजी - माजी नगरसेवक, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment