माननीय आमदार रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच सुनंदाताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज कर्जत नगरपंचायत येथे महिला सफाई कर्मचारी यांना चार चाकी गाडी चालवण्याचे मोफत प्रशिक्षण याचं उद्घाटन करण्यात आले.जेणेकरून महिला स्वावलंबी होतील. महिला कुठल्याच क्षेत्रात कुठेच कमी नाहीत तिने जर एखादी गोष्ट ठरवली तर ती पूर्ण करतेच व महिलांना पुढे नेण्याचं काम माननीय आमदार रोहित दादा पवार हे करत आहेत त्यामुळे या महिलांना प्रशिक्षण देऊन त्या फक्त कचरा गोळा करणे इतकंच काम नाही तर घंटागाडी देखील चालवणार आहेत. तसे पाहिले तर कर्जत नगरपंचायतचा कारभार देखील महिलांच्या हाती आहे 17 पैकी 11 सदस्य या महिला आहेत. आमदार
रोहित दादा हे महिला सशक्तीकरणासाठी खूप प्रयत्न करत आहेत याबद्दल त्यांच सर्व महिलांच्या वतीने आभार..!!
No comments:
Post a Comment