रोकडा सावरगाव इथे लावलेल्या एक हजार वृक्षांची सयाजी शिंदे यांच्याकडून पाहणी
रोकडा सावरगाव ( लातूर ) : निसर्गाचा बघडत असलेला समतोल हा मानवासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे मत सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. ते लातूर जिल्ह्यातील रोकडा सावरगाव इथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव इथे गेल्या वर्षी सह्याद्री देवराई प्रतिष्ठानच्यावतीने जवळपास एक हजार वृक्षांचे भव्य वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यामुळे लावलेल्या त्या वृक्षारोपणाच्या जतन संवर्धनाचा आढावा भेटीसाठी सिनेअभिनेते तथा सह्याद्री-देवराई प्रतिष्ठानचे प्रमुख सयाजी शिंदे यांनी रोकडा सावरगावला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत प्रसिद्ध लेखकी अविनाश जगताप यांचीही उपस्थिती. याप्रसंगी रोकडा सावरगाव ग्रामस्थांतर्फे सयाजी शिंदे यांच्या माध्यमातून सुरु असलेल्या वृक्ष चळवळीचा इथे आयोजित कार्यक्रमात सत्कार करून गौरव करण्यात आला. याप्रसंगी सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप, माजी मंत्री, भाजप नेते विनायकराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे, शिवराज धोंडगे, विलास चामे, पत्रकार शशिकांत पाटील, चंद्रकांत मद्दे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
सत्काराला उत्तर देताना सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे पुढे म्हणाले की, रोकडा सावरगाव हे जवळपास ०५ हजार वस्तीचे गाव आहे. मात्र फक्त ०१ वृक्ष लावून चालणार नाहीत. तर प्रत्येक ग्रामस्थाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचे आवाहनही त्यांनी ग्रामस्थांना केले. तसेच गावातील तरुण सुशील घोटे पाटील यांनी सुरु केलेल्या कार्याचे कौतुकही केले. यापूर्वीही आपला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे येऊ न शकल्याची खंतही त्यांनी यावेळी नम्रपणे सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनीही मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की, आपल्या पुढील पिढीला आपली आठवण ही घर बांधून किंवा पैसा कमवून होणार नाही. तर फक्त आणि फक्त ते झाड लावल्यानंतर त्या झाडाचे मिळणारे फळ आणि सावलीतूनच तुमची आठवण कायम राहू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त झाडे लावण्याचे आवाहन जगताप यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशील घोटे पाटील यांनी केले. त्यात त्यांनी रोकडा सावरगाव मध्ये सुरु असलेल्या वृक्ष चळवळीच्या कामाची सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी रोकडा सावरगाव गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी तुरेवाले यांनी केले. तर उपस्थितांचे आभार दिपकराव जाधव यांनी मानले.
No comments:
Post a Comment