गुणरत्न सदावर्ते सातारा पोलीसांच्या ताब्यात; अटकेची कारवाई सुरू
सातारा; : सातारचे खा. उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे खा. छत्रपती संभाजीराजे यांच्या विषयी ‘अफजलाच्या औलादी, मी असल्या गादींच्या छत्रपतींना मानत नाही,’ असे बोलून ऐन मराठा आरक्षणाच्या काळात खळबळ उडवून देणार्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात गुरुवारी सातार्यात आणले. त्यांच्यावर आता अटकेची कारवाई सुरू असून कोर्टात कधी हजर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, साताऱ्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त असून परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.
सदावर्ते यांच्याविरुध्द सातरा पोलिस ठाण्यात 2020 साली तक्रारदार राजेंद्र निकम रा. तारळे ता.पाटण यांनी तक्रार दिलेली आहे. एका टीव्ही चॅनेलवर सदावर्ते यांनी दोन्ही राजेंविषयी बेताल वक्तव्य केले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर आतापर्यंत तीन पोलिस तपासी अधिकारी नेमण्यात आले आहेत. सध्या पोनि वंदना श्रीसुंदर या तपासी अधिकारी आहेत.
गुरुवारी आर्थर जेल मधून सदावर्ते यांचा पोलिसांना ताबा घेतला. ट्रान्झिट रिमांडवर साताऱ्यात आणल्यानंतर आता त्यांना अटक केली जाईल. यावेळी अटक पंचनामा करून संशयित आरोपी सदावर्ते यांची वैद्यकीय तपासणी (मेडिकल) करण्यासाठी त्यांना सिव्हिलमध्ये नेले जाईल. यानंतर कायद्या प्रमाणे अटक केल्यानंतर संशयिताला २४ तासात कोर्टात हजर केले जाते. यामुळे सातारा पोलिस मेडिकलनंतर लगेच प्रभारी कोर्ट समोर हजर करणार की उद्या कोर्टात नेणार हे थोड्या वेळात स्पष्ट होईल.
No comments:
Post a Comment