नायगांव येथे लोकसहभागातून ग्रंथालयाचा शुभारंभ - latur saptrang

Breaking

Thursday, April 14, 2022

नायगांव येथे लोकसहभागातून ग्रंथालयाचा शुभारंभ

 


नायगांव येथे लोकसहभागातून ग्रंथालयाचा शुभारंभ नायगांव :- कळंब तालुक्यातील नायगांव येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आज दि १४ गुरुवार रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी शाळेत  समर्पित बहूउद्देशीय सेवाभावी संस्था लातुर यांच्या वतिने लोकसहभागातून ग्रंथालय या योजनेचा संगिताताई वाघे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.परिसर विविध रांगोळ्याने सजला होता. तबला व पेटीच्या सुरात विविध गाण्यांचा सर्वांनी आस्वाद घेतला  तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वनमाला पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या उमाताई व्यास.शिवानी परदेशी ललिता जाधव.तर संस्थेचे पदाधिकारी मयुरेश उपाडे.शुभम मुळजकर.सोहम कुराडे .अमर मिटकरी.विशाल कणसे.विकास वाघ कुलकर्णी.तसेच शाळेचे मुख्याध्यापक रमेश नाईकवाडे . मनोज गणापूरे.रेणेवाडे. आयोगले. कांबळे. डुकरे.आदी सर्व शिक्षक.रुक्मीणी गणापुरे. सोमोसे मॅडम. आदी शिक्षीका. वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आल्फिया मणियार.व मुस्कान मणियार या विद्यार्थ्यांनीनी केले तर आभार प्रदर्शन ललिता जाधव यांनी केले.

No comments:

Post a Comment