मुंबई मेट्रोच्या मार्गिका क्र.२- अ आणि ७ चे उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण - latur saptrang

Breaking

Saturday, April 2, 2022

मुंबई मेट्रोच्या मार्गिका क्र.२- अ आणि ७ चे उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबईदि. 1–  मुंबई मेट्रोच्या 2– अ या दहिसर ते डहाणूकरवाडी  मार्गावरील आणि मेट्रो 7 दहिसर ते आरे या दोन मार्गिकांवरील मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत उद्यादि. 2 एप्रिल रोजी,  गुढीपाडव्यापासून दाखल होणार आहेत. या दोन्ही मार्गिकांचे उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार राहणार आहेत.

मुंबईतील आरे रोडगोरेगाव पूर्व येथील संत पायस एक्स महाविद्यालयाच्या पटांगणात उद्यादि. 2 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजित या लोकार्पण कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ नेते खा. शरद पवार, विधानरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरातकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेनगर विकास मंत्री एकनाथ शिंदेउद्योग मंत्री सुभाष देसाईपरिवहन मंत्री अनिल परबपर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरेवस्त्रोद्योगमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेखविरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरनगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत

दहिसर ते डहाणूकरवाडी या  मेट्रो २-अ मार्गावर ९ स्थानके असून यामध्ये दहिसर पूर्वआनंद नगरकांदरपाडामंडपेश्वरएक्सरबोरिवली पश्चिम,पहाडी एक्सरकांदिवली पश्चिमडहाणूकर वाडी  स्थानकांचा समावेश आहे. दहिसर ते आरे या मेट्रो ७ मार्गावर १० स्थानके  आहेत. आरेदिंडोशीकुरारआकुर्लीपोयसरमागाठाणेदेवीपाडाराष्ट्रीय उद्यानओवरी पाडादहिसर पूर्व या स्थानकांचा त्यात समावेश आहे. सुरुवातीच्या काळात सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत दोन्ही मेट्रो मार्ग सुरू राहणार असून एका मेट्रो ट्रेनला सहा कोच असतील. एका मेट्रोमधून २ हजार २८० प्रवासी प्रवास करु शकतील.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/EcVyRZW
https://ift.tt/zUyA1eM

No comments:

Post a Comment