उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंदजी वाखारे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, बार्टीचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे, राष्ट्रवादीचे प्रफूल सोनवणे यांच्या हस्ते स्वाधार योजनेतील पात्र लाभार्थी विध्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लाभपत्र वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित विध्यार्थ्यांना बार्टीचे प्रकल्प अधिकारी गोवंदे यांनी बार्टीच्या योजनाची माहिती सांगितली, लाभार्थी विध्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत अशोक इंगोले यांनी केले. तर शेवटी प्रफूल पटेबहादूर यांनी उपस्थिताचे आभार मानले.
कार्यक्रमास समाजकल्याणचे कर्मचारी अनंत बिजले, समतादूत सुरेश पठाडे, सखाराम चव्हाण, रितेश बगाटे, वडकुते, बिहाडे, पौळकर आदीसह विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment