वाहतूक कोंडी रोखण्यासाठी नवीन रेणापूर नाका परिसरात पोलिस चौकी स्थापन करावी - latur saptrang

Breaking

Thursday, April 28, 2022

वाहतूक कोंडी रोखण्यासाठी नवीन रेणापूर नाका परिसरात पोलिस चौकी स्थापन करावी

 वाहतूक कोंडी रोखण्यासाठी नवीन रेणापूर नाका परिसरात पोलिस चौकी स्थापन करावी




पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, उपअधीक्षक जितेंद्र जगदाळे यांना नागरिकांनी दिले निवेदन

लातूर, दि.27-04-2022

अंबाजोगाई रोडवरील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक तथा नवीन रेणापूर नाका येथे चार मुख्य रिंग रोड व आर्वी गावचा रोड असे मिळून एकूण पाच रोड येऊन मिळतात. यामुळे या ठिकाणी रात्रंदिवस सतत मोठया चार चाकी, दोन चाकी वाहनांची वर्दळ व लोकांची गर्दी होते. सध्या साखर कारखान्यांचा गाळप सुरू असल्याने ऊसांचा वाहनाची मोठ्याप्रमाणावर वाहतूक होत आहे. यातून वाहतूक कोंडी वाढली आहे. याचा त्रास सर्वांना होतो. शिवाय अपघाताचे प्रमाणही वाढले आहेत. या सर्व बाबींचा विचार करता व  गांभीर्य ओळखून नवीन रेणापूर नाका परिसरात पोलीस चौकी स्थापन करावी या मागणीचे निवेदन मंगळवारी या परिसरातील नागरिकांनी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व पोलीस उपअधीक्षक जितेंद्र जगदाळे यांना दिले.

सदरील निवेदनात असे म्हंटले आहे की, जर नवीन रेणापूर नाका तथा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक परिसरात जर पोलीस चौकी सुरू केली तर या ठिकाणी निर्माण होणारे वाहतुकीचे व इतर अनेक प्रश्न सोडविण्यासाठी  मदत होईल. निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस ॲड किरण बडे, मराठवाडा जनता विकास परिषदेचे सचिव विनोद चव्हाण, ॲड.प्रभाकर केदार, उदय गोजमगुंडे, ॲड. कानवटे, भारत गुंडरे, अरुण डोंगरे, बालाजी केंद्रे, इनायत खान पठाण, ॲड. सतीश धायगुडे,  ॲड. सचिन भताने, इरफान शेख, सोमुसे सर, ॲड. फड, आकाश जमादार, अनिल गोयकर, अरविंद कापसे आदींची उपस्थिती होती.



No comments:

Post a Comment