लातूर : लातूर शहर मनपाकडून दिवसाला पाणीपुरवठा होत असतो ही बाबच लातूरकर विसरले आहेत. कारण गेल्या अनेक वर्षांपासून 8 दिवसातून एकदा पाणी नळाला ही सवय त्यांना लागली आहे. मात्र, सध्याच्या पिवळ्या पाण्यामुळे मनपाचे अनेक रंग बाहेर पडत आहेत. दस्तुरखुद्द महापौर यांनीच लातूर शहराला दोन दिवसाआड पाणी शक्य असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता हे खरंच शक्य आहे का? हा संशोधनाचा विषय बनला आहे. केवळ कर्मचारी आणि प्रशासकीय अनास्था असल्यामुळे लातूरकरांना दोन दिवसाआड पाण्याऐवजी आठ दिवसाआड पाणी पुरवठा केला जाण्याची खळबळजनक कबुली महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी आज दिली.
Latur Water Crisis : लातूर शहराला आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जातोय. मागील अनेक वर्षांपासून शहराला आठ दिवसात दोन वेळा तरी पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आहे. मनपातील सत्ताधारी असलेल्या काँग्रेस पक्षाने याला मंजुरी दिली होती. लवकरच दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येईल, असेही ठरले. त्यासाठी यंत्रणा तयार करण्यात आली होती. प्रायोगिक तत्वावर यंत्रणा कार्यरत होईल का नाही यांच्यावर कामही करण्यात आले होते. सर्व सिद्धता झाली असताना ही प्रशासकीय यंत्रणेतील अनागोंदी कारभारामुळे सर्व सिद्धता असतानाही दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत नाही.
मांजरा धरणात आजमितीला मुबलक पाणी आहे, असे असताना ही लातूरकरांना मात्र अद्याप पाण्यासाठी आठ-आठ, दहा-दहा दिवस वाट पाहवी लागत आहे. यामागे प्रशासकीय अनास्था असल्यामुळे आम्ही धोरण तयार केले मात्र कार्यान्वित होत नाही. मनपातील कर्मचाऱ्यात एकवाक्यात आणि समन्वयचा अभाव आहे. याचा परिणाम आमच्या निर्णयावर झाला आहे, असा खेद महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment