निवाडा जिल्हा परिषद शाळा प्रेरणादायी
सामाजिक जाणीवेतून शिक्षकांचे कार्य
भाजपा युवा नेते ऋषिकेश रमेशअप्पा कराड यांचे उदगार
लातूर दि. २७- जिल्हा परिषद शाळा गोरगरीबांचे वैभव आहे. निवाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांचे कार्य कर्तव्याबरोबरच सामाजिक जाणीवेतून असून ही शाळा प्रेरणादायी असल्याने येत्या काळात ही शाळा संपूर्ण लातूर ग्रामीण मतदारसंघात एक आदर्श शाळा म्हणून उदयास येईल यात शंका नाही असे उदगार भाजपाचे युवा नेते ऋषिकेश कराड यांनी एका कार्यक्रमात बोलताना काढले.
रेणापूर तालुक्यातील मौजे निवाडा येथे १५ व्या वित्त आयोग निधी अंतर्गत बसवण्यात आलेल्या पथदिव्याचे लोकार्पण, जिल्हा परिषद शाळेतील कुपनलीकेवरील विद्युत पंपाचा शुभारंभ आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप भाजपा युवा नेते ऋषीकेश कराड यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष अॅड. दशरथ सरवदे, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकृष्ण पवार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत कातळे, भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा अनुसया फड, सरपंच बाळासाहेब बनसोडे, विठ्ठल कस्पटे, शिवमुर्ती उरगूंडे, पृथ्वीराज उरगूंडे, संगमेश्वर स्वामी, नर्सिंग चेपट, अविनाश बोराडे, प्रताप भुरे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ऋषीकेश कराड म्हणाले की, विद्यार्थ्यांना पोटच्या लेकरांप्रमाणे सांभाळून मार्गदर्शन करून त्यांचे आयुष्य चांगले झाले पाहिजे यासाठी मेहनत घेणारे आणि शाळेतून घरी जाईपर्यंत आणि दुसऱ्या दिवशी शाळेतून येईपर्यंत काळजी करणारे आजही अनेक गुरूवर्य आहेत. कर्तव्याबरोबरच सामाजिक भावनेतून शिक्षकाच्या हातून काम झाल्यास या विद्यार्थ्यांतूनच उद्याची भावी पीढी घडते. जे विचार मुलांना मिळतात त्यावरच त्यांची वाटचाल होते. तेव्हा सुसंस्कृत पीढी कशी निर्माण होईल यासाठी प्रयत्न करावेत असे अवाहन केले.
विधान परिषदेचे सदस्य आपले नेते आ. रमेशअप्पा कराड यांच्या माध्यमातून लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील गावागावात वाडीतांडयासाठी निधी उपलब्ध करून विविध विकासाची कामे केली जात असल्याची माहिती देवून ऋषिकेश कराड म्हणाले की, विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी शिक्षकांनी शिक्षणाबरोबरच खेळाकडे लक्ष द्यावे. निवाडा जिल्हा परिषद शाळेच्या प्रगतीसाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांना खेळासाठी जी काही मदत लागेल ती आपण करू अशी ग्वाही दिली. पैसे अनेकांकडे आहेत मात्र खर्च करण्याची दानत नाही. शाळेतील गैरसोय लक्षात घेवून पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी शिक्षिका भाग्यश्री चव्हाण यांनी स्वखर्चातून शाळेसाठी बोअरवेल दिला त्याबद्दल त्यांचे यावेळी ऋषिकेश कराड यांनी कौतुक केले.
याप्रसंगी अॅड. दशरथ सरवदे आणि चंद्रकांत कातळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमास शेख गफूर, राम लकडे, बिभिषन कसपटे, सदाशिव बनसोडे, सतीश कस्पटे, रसूल शेख, सुरेश गिरी, दिनेश उरगूंडे, नाकस गायकवाड,गोविंद उरगुडे, वसंत साळुंके, राजाभाऊ घाटूळे, अमर उरगुंडे, शाळेतील शिक्षक एम. के. धनाडे, रमाकांत पांचाळ, सत्यशीला कलशेट्टी, जगताप सर, गणेश मुंडे, यांच्यासह ग्रामस्थ शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment