अमरावती जिल्ह्यातील सिंभोरा, शेकदरी निसर्ग वन पर्यटन केंद्र विकसित करावे – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे - latur saptrang

Breaking

Wednesday, April 20, 2022

अमरावती जिल्ह्यातील सिंभोरा, शेकदरी निसर्ग वन पर्यटन केंद्र विकसित करावे – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. 20 : अमरावती जिल्ह्यातील सिंभोरा व शेकदरी सिंचन प्रकल्प येथील निसर्ग वन पर्यटन विकसित करण्यासाठी वन विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देश वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

मंत्रालयातील दालनात सिंभोरा व शेकदरी सिंचन प्रकल्प येथे निसर्ग पर्यटन केंद्र विकसित करण्याबाबत आयोजित बैठकीत वने राज्यमंत्री श्री. भरणे बोलत होते. यावेळी आमदार देवेंद्र भुयार, उपसचिव वने बा.ना.पिंगळे, नागपूरचे उपवनसंरक्षक बाला यावेळी बैठकीला उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री.भरणे म्हणाले,अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील सिंभोरा सिंचन प्रकल्प (नल-दमयंती सरोवर) हा प्रकल्प प्रसिद्ध असून येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. या ठिकाणी पर्यटन सुविधा वाढल्यास स्थानिक ठिकाणी पर्यटन वाढीस चालना मिळून रोजगार निर्मिती होईल तसेच शेकदरी सिंचन प्रकल्प येथेही पर्यटन वाढीस चालना देण्यात यावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. वन विभागाने यादृष्टीने कार्यवाही करावी. सिंभोरा व शेकदरी सिंचन प्रकल्प या दोन्ही भागात निसर्ग वन पर्यटन विकसित करण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशा सूचना राज्यमंत्री श्री.भरणे यांनी बैठकीत दिल्या.

आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी अमरावती जिल्ह्यातील सिंभोरा व शेकदरी सिंचन प्रकल्प येथील निसर्ग वन पर्यटन विकसित करण्याबाबत सविस्तर मुद्दे बैठकीत मांडले.

******



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/JN7XSWG
https://ift.tt/jYGKOCP

No comments:

Post a Comment